चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

kuldeep p


kuldeep p

नाही राहिली मला आता आवड कवितेची

धुसर झाली आहे शाही त्या पेनाची

आता कोऱ्या कागदालाही किंमत नव्हती

कारण शाहीने कागदाची साथ सोडली होती
:'( :'( :'(


मधुरा दी तुझ्यासाठी

Madhura Kulkarni

Nice try, Prajdeep.

कोरा कागद तुझा हा,
कोरा नाही राहिलेला....
शाईहूनहि निर्मळ
आसवांनी लिहिलेला...


मिलिंद कुंभारे

स्याही संपली म्हणून,
सोडू नकोस तू,
कविता लिहायचा!
शोधू नकोस तू,
पेन दुसरा तिसरा!
रक्ताच्या थेंबा थेंबानी,
लिही तू कविता!
अन ओसंडून जाऊ दे,
नयनी गोठलेल्या भावनांना!

मिलिंद कुंभारे

Yogesh9889

Antarangi pavsat,
Tu chimb bhijleli,
Tuzya ashrutil themb n themb,
Janu moti banun padleli. .   
*******YOGESH*******

कवि - विजय सुर्यवंशी.

#125

भावना माझ्या मनाच्या सखे,
कधी कळतील काय गं तुला....
निरंतर जपलेली गुलाबाची फुलं तुला द्यायचा,
कधी धीर होइल काय गं मला...

  भेटीसाठी मी अजुनही अधीर आहे....
  आतुरता माझ्यासारखीच आहे का तुला..
  फुलपाखरापरि  अजुनही मी फिरतो...
  खरच तू भेटशील का माझ्या फुला ......

Madhura Kulkarni


kuldeep p

माझ्या मनाला कोणी समझावे

प्रेमापासून  कसे दूर राहावे

वाटते नेहमी त्याच वर्गात बसावे

प्रेमाचे धडे वारंवार शिकत राहावे
 

कवि - विजय सुर्यवंशी.

thank you madhura ji....

कवि - विजय सुर्यवंशी.

तुला पाहुनी मी..
आजही थिजतो...
मनातल्या भावनात...
स्वताच हरतो....
तुझ्या ओढित शब्द सुचतात कधीतरी..
अन मित्र म्हणतात..
मी कविता करतो...