चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

Madhura Kulkarni

रात्रीत वाहतो हा मंद मंद वारा
चांदण्यांवरीहि चंद्राचा पहारा...
धुंद वेळी अश्या तुझ्याचसाठी
बघ सखे हिरवी होतो धरा

sweetsunita66

!हळुवार वाऱ्याने पदर हलला जरी
  तुझ्या प्रेमळ स्पर्शाचा भास होतो उरी
डोळ्यातच रात्र सरते ,भान नसे मना
   मनातील भवनाचा ठाव लागे जना ............. सुनिता नाड्गे [शेरकर ]

कवि - विजय सुर्यवंशी.

माझ्या मनातील भाव तिने हेरलेले.....
एसटीच्या बाकावर दोघांचे नाव कोरलेले.....
अजुनही ती एसटी छळत असते मला.....
मी गाफिल होतो अनं सईने काळीज चोरलेले.....

sweetsunita66

माझ्या मनातील भाव तिने हेरलेले.....
एसटीच्या बाकावर दोघांचे नाव कोरलेले.....
अजुनही ती एसटी छळत असते मला.....
मी गाफिल होतो अनं सईने काळीज चोरलेले.....
:) :)

sweetsunita66

एसटी च्या बाकावर तिचे लिहू नका  नाव
एसटी तर राष्ट्रीय संपत्ती आहे  ना राव ?
नाव कोरायचे तर तुझ्या  हृदयाची कर पाटी
मग पहा  सई कशी धावत येते तुझ्या साठी ! :D :D

Madhura Kulkarni

वाह! ,मस्त चालू आहे...चालू दे, चालू दे.

sweetsunita66


कवि - विजय सुर्यवंशी.

छान सुनिता जी :D:D:D

एस टी आहे राष्ट्रिय संपती याची मला जाण.....
नाव कोरण्याचा पराक्रम सईने केला.....
अन नव्हते तिला भान.....
पुन्हा असं कधिच घडणार नाही.....
याचं नेहमी भान ठेवेन.....
अनं प्रेमाच्या तिच्या अडिच अक्षरांसाठी.....
पाटी माझ्या ह्रुदयाची तिच्या हाती ठेवेन.....

     - विजय सुर्यवंशी.
      (यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66

नुसतीच पाटी तिच्या हाती देऊन चालणार नाही गडे ,
तिच्या बरोबर तुलाही गिरवावे लागतील प्रीतीचे धडे  :D :D

कवि - विजय सुर्यवंशी.

ह्रुदयाची पाटी अनं प्रेमाचे धडे.....
अडिच अक्षरांचे शब्द वाटताहेत बे चे पाढे.....
कठिण असले तरी पाढे म्हणावेच लागणार.....
तुझ्या माझ्या नात्यासाठी सई.....
प्रेमाचे धडे हे गिरवावेच लागणार,....