चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

प्रेमाचे धडे गिरविणे हेच तुझे काम
तिने साद दिल्यावर वसूल झाला दाम  :D :D

कवि - विजय सुर्यवंशी.

सई तु दिलीस साद.....
अन मिळाली माझी दाद.....
हसु येतयं या लोकांना आपल्या नात्यावर....
कसा एकटा घालु यांच्याशी मी वाद..... :(

sweetsunita66

वाद कुणाशी घालून वेळ  वाया घालू नकोस
सर्वांना पटविण्याचा घाट घालू नकोस
सई जर तयार अन तू  ही आहेस  तयार
तर प्रेमाला  तुमच्या येऊ द्या न बहर  :D :D

कवि - विजय सुर्यवंशी.

छान सुनिता जी..... :*

सुनिता जी अडिच अक्षरांच्या या खेळात.....
वाद आता होणारंच.....
नाती समजावुन सांगताना.....
वेळ वाया जाणारंच.....
श्वापदांच्या जगती काटेच गुलाबांच्या फुलांना बोचतील.....
अन माझ्या अन सईच्या नात्याचं मोल त्याना कधीच नाही कळणार..... :(

sweetsunita66

प्रेण  हे अक्षर गिरविता येते पटकन
संबंधातला दुरावा संपुष्टात येतो का चटकन ?
नसेल सई ची हरकत तर समजून घ्या सारे ,
नाहीतर उगाच वेळ जाईल ,अन थांबेल प्रेमाचे वारे  ,
:D

कवि - विजय सुर्यवंशी.

#205
सुनिता जी छान सल्ला होता..... :D


मला सई, अन सईला मी हवा आहे.....
आमचं नातं म्हणजे दोन घरातील दुवा आहे.....
भेदभावाचे कलह आम्हाला थांबवायचे आहे.....
अभागी या माणसांना आता प्रेमाने जिंकायचं आहे.....
सई आधी ही तयार होती अन आता ही आहे.....
तिच्या वेड्या हट्टासाठी मला सर्वाँना सोबती घ्यायचं आहे.....
सरतेशेवटी निर्णय हा तिचाच असेल.....
अन प्रेमाच्या या फांदीवर अंकुर लवकरंच फुलेल.....

कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66

तुमच्या या  प्रेम बंधनाची ,
आम्ही आतुरतेने वाट पाहतोय ,,
घाई झाली आम्हाला पण,
प्रेमाच्या या वेलीवर नवा अंकुर कधी फुटतोय ।  :D :D

कवि - विजय सुर्यवंशी.

छान REPLY दिलात सुनिता जी.....

तुमच्या या  प्रेम बंधनाची ,
आम्ही आतुरतेने वाट पाहतोय ,,
घाई झाली आम्हाला पण,
प्रेमाच्या या वेलीवर नवा अंकुर कधी फुटतोय । 


नातं हे जुळुन आलं तर मी आनंदाने नाचेन.....
सईवरील कविता मी मोठमोठ्याने वाचेन.....
शब्दांची फुले होतील अन कवितांचा पाऊस पडेल.....
मग आपणही हसाल खळखळुन अनं हसण्यासाठीही कविता रचेन.....

sweetsunita66

thats the spirit :D :D
खळ-खळून हसल्याने प्रकृती छान राहीन
तुम्ही दिलीत संधी तर आभार तुमचे  मानीन  :D :D :D

कवि - विजय सुर्यवंशी.

हसण्यासाठी योग.....
अन वेळ च हवा काय.....
अन संधी देण्यासाठी.....
'तुमच्यासाठी काय पण' म्हणायलाच हवं काय...? :D