चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66


कवि - विजय सुर्यवंशी.

डोळ्यात आँसु अन ओठावर हसु.....
हि किमया तर गाडीच्या मिरर ची पण आहे.....
खेळ खेळण्या हा चारोळीचा.....
सुनिता जी, आपल्या चार ओळींची गरज साहे.....

sweetsunita66

गाडीचा  मिरर असो वा असो आरसा
प्रतिबिंब त्यात दिसे जसा कि तसा
डोळ्यात तुमच्या असेल  जर आसू
तर दिसणार कसे आरश्यात हसू  :)

sweetsunita66


केदार ,मिलिंद ,अन मधुरा का केलेस बंद लिहिणे
तुमच्या चारोळी साठी आसुसलोय आम्ही पाहुणे
तुमच्या चारोळ्यांची अंताक्षरी येवू द्या रंगत
मग आम्हीही चारोळ्यांची मांडतोय पंगत  :D :D

कवि - विजय सुर्यवंशी.

लंबगोल आरश्याची आहे किमया न्यारी.....
ट्रॅफिकमध्ये आसु अन हसुची गंमत भारी.....
:D :D
केदार, मिलीँद अनं मधुरा.....
तुमच्याविना चारोळी चा हा खेळ अधुरा.....
पुन्हा येवु द्या शब्दांना बहार.....
अन गवसु द्या पुन्हा कवितेचा किनारा..... :D

Madhura Kulkarni

#215

वाह! माझ्यावर सुद्धा कविता करून टाकली तुम्ही.... मस्त, मस्त!

ऐका तर मग,

ट्राफिक असो वा गर्दी मला एकटेपणाचा शाप आहे,
इंजिनीअरिंगच्या शिक्षणाचा डोक्याला माझ्या ताप आहे....
पण 'कविता करणे' सोडण माझ्यासाठी पाप आहे....
तुमच्या माझ्यावरच्या कविता माझ्या यशाचं माप आहे...  :) :)

sweetsunita66

घेतला एकदा  इंजिनियर बनण्याचा वसा,
मग डोक्याला ताप आहे म्हणता कश्या ,
हातात घेतलेलं काम कधी अर्धवट सोडायचं नसते ,
आपल्या बरोबरच आई -बाबांनी पाहिलेलं  ते स्वप्न असते .  :) :)

sweetsunita66

इंजिनियर बाई तुमच्या वर मराठी साहित्त्याची छाप .,
उत्कृष्ठ कविता अन चारोळ्याची प्रस्तुती तुमच्या यशाचे माप .  :) :) :)

कवि - विजय सुर्यवंशी.

आभारी आहे मधुराजी.....

:D :D

वाह! माझ्यावर सुद्धा कविता करून टाकली तुम्ही.... मस्त, मस्त!

ऐका तर मग,

ट्राफिक असो वा गर्दी मला एकटेपणाचा शाप आहे,
इंजिनीअरिंगच्या शिक्षणाचा डोक्याला माझ्या ताप आहे....
पण 'कविता करणे' सोडण माझ्यासाठी पाप आहे....
तुमच्या माझ्यावरच्या कविता माझ्या यशाचं माप आहे...  :) :)

आता इंजिनिअरबाई तुम्ही ऐका.....

"दिवस सारा सरुन  गेला.....
अन चांदरातीला सुरवात झाली.....
खेळ खेळण्या चारोळीँचा.....
पुन्हा आता लगबग झाली....."

     विजय सुर्यवंशी.
  (यांत्रिकी अभियंता)

swara

सकाळच्या वेळी
चांदण्यांचा भास
आजही मला
तुझीच का आस  >:(