चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

भावना रुपी धरेला आता सावरायला हवं....
आयुष्याच्या वेड्या वळणी सावरायला हवं....सावरायला हवं.... :)

मिलिंद कुंभारे

#291
कवि - विजय सुर्यवंशी..
इमले स्वप्नांचे तर रोजच रचतो मनात....
घर प्रितीचं आता सईसाठी बांधायला हवं....

sweetsunita....
पाणावलेल्या नेत्रांना उसंत असावा  जरा,
काळजाचा  ठाव घेते  भावना रुपी धरा .....

Madhura....
कधी कधी वाटत,
मनोसोक्त जगावं....
कधी तरी पक्ष्यापरी
मुक्तपणे उडावं.....

फारच छान ..... :) :) :)

आयुष्य अधांतरीच थांबल्यागत झालंय.........
दोन दिवस आयुष्यातले निवांत जगावं वाटतं.........
झुगारून देऊन सगळीच बंधनं......
काही क्षण स्वतः साठीच जगावं वाटतं .......

मिलिंद कुंभारे

sweetsunita66

आयुष्य अधांतरीच थांबल्यागत झालंय.........
दोन दिवस आयुष्यातले निवांत जगावं वाटतं.........
झुगारून देऊन सगळीच बंधनं......
काही क्षण स्वतः साठीच जगावं वाटतं ....... :) छान!!!!
               आयुष्याचा धापाधापित स्वतः साठी जगायचंच राहिलं
जीवनाचे गुपित हे पूर्णपणे उमलायाचाच राहिलं.... sunita :)
                         

मिलिंद कुंभारे

किती दिवस असं खोटं खोटं हसावं, खोटच जगावं,
जगाला फसवाव, कि स्वतः लाच समजवावं,
आज पुन्हा वाटतं, कुशीत तिच्या शिरावं,
अन  पुन्हा एकदा मनसोक्त रडावं ......

sweetsunita66

किती दिवस असं खोटं खोटं हसावं, खोटच जगावं,
जगाला फसवाव, कि स्वतः लाच समजवावं,
आज पुन्हा वाटतं, कुशीत तिच्या शिरावं,
अन  पुन्हा एकदा मनसोक्त रडावं ......
    वाह वाह छान ! :) :) आपण तरुण झाल्यावर वाटते पंख फुटलेत की  काय?  जगाच्या पाठीवर  कुठेही भरारी मारू शकतो, पण दुनियादारीच्या  जाळ्यात फसल्या वर मात्र स्वतः साठी जगणं राहूनच जाते . तेव्हा मायेची पाखर शोधता आईची कुशीच मिळते ,त्याच्या सारखी दुसरी आपल्या हक्काची अन प्रेमाची जागा मिळू शकत नाही ... :)

मिलिंद कुंभारे


sweetsunita......छान लिहिलंय

दुर्मिळ झालीय ती मायेची कुशी आज मला,
अन खऱ्या अर्थाने झालोय मी पोरका,
स्थिरावलीत सगळीच सुख स्वप्ने क्षणार्धात आता,
भरारी घेऊ कसा, शून्या नजीक थांबल्या साऱ्या दिशा .......  :( :( :(

swara

दही दिशि आनंद आहे
प्रेमाचा ओलावा आहे
मित्रा सावर स्वतःला मायेची
कुशी अजूनही तुझ्या सोबत आहे

Madhura Kulkarni

#297
धन्यवाद सुनिता दी, मिलिंद दा....

तिच्या शिवाय.....

तिच्याशिवाय जगणे
नाही आता शक्य....
ती च माझ्या शब्दांत,
ती च माझ वाक्य....

ती च सारे ऋतू,
उन्हाळा-हिवाळा,
नयनांमधला ती च
धुंद पावसाळा......

ती च डोकावते आज
माझ्या कवितेत....
तिचीच छाप आहे
माझ्याही प्रतिमेत....


मधुरा कुलकर्णी.

कवि - विजय सुर्यवंशी.

#298
अरे वाह! छान चाललाय खेळ.....
.
.
.


      "चांदरात"
.
.
.
"चांदण्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात....
मी सईला पाहिलं....
पाठमोय्रा लोभस तिच्या प्रतिमेला....
प्रेमळ नजरेने न्याहाळलं....
.
.
हळवं माझं मन....
तिच्यात गुंतत गेलं....
कळालंच नाहि कधी....
नातं प्रितीचं उमलत गेलं....
.
.
चांदण्यांच्या प्रकाशात फुले प्रितीची वेचताना....
साथ आम्हास चंद्राची होती....
प्रितीच्या अशा एकांत समयी....
सई माझ्या मिठीत होती....
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
       (यांत्रिकी अभियंता)
.
.
.
(चांदराती वर कविता करता करता....
शृंगारीक कविता झाली....
गांभिर्य वेळीच उमगले म्हणुन....
पुर्ण कविता POST नाही केली.... :| )

मिलिंद कुंभारे

#299
तीच सारे ऋतू,
उन्हाळा-हिवाळा,
नयनांमधला तीच
धुंद पावसाळा......

मधुरा ताई...
फारच छान लिहिलंय .......
अगदी माझ्याच मनातलं ...... :)

तिचं ऐवजी तीच असायला हवं होतं असं वाटतं ....... :-\

prachi B....
thanks for nice lines.... :)