चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

दुर्मिळ झालीय ती मायेची कुशी आज मला,
अन खऱ्या अर्थाने झालोय मी पोरका,
स्थिरावलीत सगळीच सुख स्वप्ने क्षणार्धात आता,
भरारी घेऊ कसा, शून्या नजीक थांबल्या साऱ्या दिशा .......   
मिलिंद ,मधुरा ,विजय अन प्राची छान जमलीय तुकबंदी ,अतिशय भावनापूर्ण ..........
दाही दिश्या बोलावतात तुला नको असा उदास होऊ
जीवनाच्या या एकटेपणी नको असा विचलित होऊ
शोधता गवसेल तुम्हाही यशाची पायरी
वेळ  असता हाती तू मनास सावरी
नसे जरी ममत्व अन कुरवाळणारी माय ती
परी असे आशिष तिचा तू न   अनाथ या जगती .........। सुनिता  :)

मिलिंद कुंभारे

sweetsunita......

नसे जरी ममत्व अन कुरवाळणारी माय ती
परी असे आशिष तिचा, तू न अनाथ या जगती .........

अगदी  बरोबर आहे ...छान .... :) :) :)

ह्यावर मी एक कविता लिहीन लवकरच ......

sweetsunita66

धन्यवाद मिलिंद  :)तुमच्या कविता आणि चारोळ्यांची आम्ही वाटच पाहतोय

मिलिंद कुंभारे

#303
मधुरा, सुनिता, प्राची आपल्या प्रतिसादातूनच जन्मास आलेली हि एक कविता .... बघा आवडते का ????


तुझे नसणे ... स्वप्न अधुरे ......

तुझे नसणे
जगण्यास माझ्या
ग्रहण जसे
स्वप्नवत सारे
स्वप्नातच तुझे भेटणे
अंश मी तुझे
कि माझ्यातच
अंश तुझे
चाहूल तुझी
कि भास मनाचे ......

दिस सरले
ऋतू बदलले
नभ एक चिमुकले
ओंजळीत माझ्या
नकळत  अवतरले
त्याचे बिलगणे
त्याचे खिदळणे
बा~ ~  बा ~ ~ असे
बोबडेच बोलणे
सारेच कसे लुभावणे ......

मज कळेना
तुझे नसणे
खंत असे
कि तुझे असणे
सत्य दुजे
दु:ख अंतरीचे
कि सुख परतीचे
आभास म्हणावे
कि मज आशिष तुझे
क्षण फसवे
खेळ नियतीचे
कि गतजन्मीचे
तुझे, स्वप्न अधुरे ......

मिलिंद कुंभारे

sweetsunita66

 :) :) :) vvvveeeeeeeeeeeerrrrrrrrrryyyyyyyyyyyyyy nice

Madhura Kulkarni


कवि - विजय सुर्यवंशी.

छान आहे, मिलिंद....
.
.
.
"तिला आठवता मनात माझ्या....
आसवांची भरती होते....
एकाकी या जिवनी फाटतो शिड होडीचा....
अनं नौका हि आयुष्याची भुतकाळात बुडुन जाते...."
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)

मिलिंद कुंभारे

Madhura, कवि - विजय सुर्यवंशी

प्रतिसादाबद्दल धन्यवाद .... :)

कवि - विजय सुर्यवंशी
तिला आठवता मनात माझ्या....
आसवांची भरती होते.... :)

फारच सुंदर ...अगदी मनातलं बोललात ...... :)

कवि - विजय सुर्यवंशी.

धन्यवाद मिलिंद ओळी आवडल्या बद्दल...

कवि - विजय सुर्यवंशी.

अरे कुठे गेले सगळे :/