चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

 अरे वाह,मिलिंद ! चारोळ्यांची पंगत मांडणे
                     काम नसे हे कुणा एकाचं   ,
                     मिलिंद ,केदार अन मधुरा
                     तुम्ही पण एखादी चारोळी फेकाचं  !!!  :) :)

Madhura Kulkarni

सुनिता दी, खास तुझ्या आग्रहास्तव....

का लपवू भावना आता मी,
ओठांवर आले गीत तुझे....
शब्द तुझे, सूर-ताल तुझे
अन त्याला संगीत तुझे.....


sweetsunita66

 :)  धन्यवाद  मधुरा  :)  शब्दबंधाच्या या जगती मी अशी भाम्भावलेली ,
                              न उमजे यमक छंद रचना माझी रेंगाळलेली  :(

santoshi.world

sunita and madhura tumhi doghi pan instant charolya mast karata ha ... keep posting :)


santoshi.world

हवे तसे व्यक्त कर स्वत:स
नको पडू शब्दबंधात,
आवडो न आवडो ती कोणा
कर तू रचना मुक्तछंदात...

- संतोषी


:)  धन्यवाद  मधुरा  :)  शब्दबंधाच्या या जगती मी अशी भाम्भावलेली ,
                              न उमजे यमक छंद रचना माझी रेंगाळलेली  :(

मिलिंद कुंभारे


हवे तसे व्यक्त कर स्वत:स
संतोषी ताई,
पटलंय ... :)



नको पडू शब्दबंधात,
आवडो न आवडो ती कोणा
कर तू रचना मुक्तछंदात...

- संतोषी


:)  धन्यवाद  मधुरा  :)  शब्दबंधाच्या या जगती मी अशी भाम्भावलेली ,
                              न उमजे यमक छंद रचना माझी रेंगाळलेली  :(

santoshi.world

@ milind : tai vaigare nako mhanu re ... tuzya peksha lahan ahe mi 10 years ne :P :D ..... ani mi tula dada etc. mhananar nahi ha ............ coz tai dada ase nate lavalech pahije ka darveli nikhal maitri asu shakat nahi ka  :-\ ..... ani ho tuza reply na quote chya varati lih ... mhanje patakan lakshat yete ... quote chya aata nako lihus .... reply shodhava lagato mag :)

कवि - विजय सुर्यवंशी.

(मिंत्रांनो तुमच्या सानिध्यात चारोळी लिहायची म्हटली की त्याची कविताच पुढे सुचते)
.
.
  "परतुनी ती येईल का ?"
.
.
मुक्तछंदानेच शब्दबंध हे जडती...
भावनांच्या सानिध्यात दुर मजला नेती...
अनं आयुष्याच्या हिंदोळ्यावर बसुनी...
यमकछंदांचा पसारा मांडती...
.
.
कुणी विरह तर कुणी प्रिती...
सोबत घेऊनी नात्यांची निती...
आभासी या शब्दांच्या  जगती...
कुणी स्वप्नांचे इमले बांधती...
.
.
प्रितीबंधांचे अविस्मरणीय क्षण...
स्तब्ध ठेऊनी अबोल ओठी...
आठवणीस त्या वाट देण्या...
कुणी करतं कविता आपुल्या सईसाठी...
.
.
कुणी वर्णितं तिचे खट्याळ भाव...
कुणी तिझिया सौंदर्या भुलती...
कुणी तिजला आपुल्या कवेत घेऊनी...
स्वप्नांच्या त्या झुल्यावर झुलती...
.
.
भावनेला शब्द शोधणारा तो कवि...
मग स्वताच्या जगती हरवुन जातो...
स्वप्नात दिसणाय्रा सईकरता...
सजिव भावनांची कविता करतो...
.
.
दिवसा गणिक दिवस हे निघुनी जाती...
हा वेडा शब्दगंधात विरतो...
अनं स्वप्नातल्या स्वप्नपरि साठी...
सजिव भावनांना शब्द शोधतो...
.
.
सोडुनी जाता सई त्याला या नश्वर जगातुनी...
आयुष्यातली त्याची उमेद संपते...
सोडुनी ती गेल्यावरही...
तिच्या कवनांनी त्याच्या मनाची वही भरते...
.
.
करतोय तो विचार अजुनही...
परतुनी ती येईल का...??
विरहाचा तो योग संपुनी...
गीत प्रितीचे साकार होईल का...??
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66

मुक्तछंदानेच शब्दबंध हे जडती...
भावनांच्या सानिध्यात दुर मजला नेती...
अनं आयुष्याच्या हिंदोळ्यावर बसुनी...
यमकछंदांचा पसारा मांडती  :) :) :) :) :)
                                      ही यमक-छंदाची जुळवण जमेना मला
                                      म्हणून चारोळीचाच प्रसाद देते  आहे तुला
                                        कविता लिहिणे आताशा जरा अवघडच झाले
                                        मात्रा यमकाच्या गुंतागुंतीत मी चक्रमच झाले  :(.... सुनिता

vinod.patil.12177276


जीवनाचा अर्थ माझ्या
शब्दाविन सापडेना
आत मनाशी शब्द भांडले
शब्द शब्दाला जुळेना

ते वेड माझे कधी मलाही
सोडुन गेले कळेना
मन लोटले खाईत तरी
वेड मनास येईना ...