चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.


मुक्तछंदानेच शब्दबंध हे जडती...
भावनांच्या सानिध्यात दुर मजला नेती...
अनं आयुष्याच्या हिंदोळ्यावर बसुनी...
यमकछंदांचा पसारा मांडती  :) :) :) :) :)
                                      ही यमक-छंदाची जुळवण जमेना मला
                                      म्हणून चारोळीचाच प्रसाद देते  आहे तुला
                                        कविता लिहिणे आताशा जरा अवघडच झाले
                                        मात्रा यमकाच्या गुंतागुंतीत मी चक्रमच झाले  :(.... सुनिता
:p

Madhura Kulkarni

Thanks Santoshi. :)

sunita and madhura tumhi doghi pan instant charolya mast karata ha ... keep posting :)




आता माझी एक चारोळी....


डोळ्यात हरवले शब्द अन,
मी बोलताना थांबले,
अंतर तुझ्या-माझ्यातले,
  नकळत माझ्या संपले.....

sweetsunita66


डोळ्यात हरवले शब्द अन,
मी बोलताना थांबले,
अंतर तुझ्या-माझ्यातले,
  नकळत माझ्या संपले..... :) :)
         अरे वाह! मधुरा  :)
आता माझी बारी हं !! :) :)
   
शब्द हरवले डोळ्यात कि ,मूक झाल्या भावना ,
,गुपित सखे अंतरीचे आज मज सांगना
    सख्य तुझे नी माझे असे काव्यातुनी बहरलेल ,
निरंतर साद तुझी मज  येईल ना सखे सांगना, :) :) :)
     

sweetsunita66

sunita and madhura tumhi doghi pan instant charolya mast karata ha ... keep posting :)
 
               :)
धन्यवाद संतोषी !!! :) :)

कवि - विजय सुर्यवंशी.

मुक्या भावनांना बघ आता सई....
पाणिदार डोळ्यांची साथ आहे....
कळले मजला तुझिया मनाचे गुपित....
अनं जपलेल्या शब्दबंधांची जी बात आहे....
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
       (यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66


vijaya kelkar

               मध्येच डोकावू?

  'फडफडणाऱ्या पापणीची
       व्याकुळता बोचली
  धडधडणाऱ्या  जीवाची
       अधीरता टिपली '

कवि - विजय सुर्यवंशी.

        "निशब्द"
.
.
मनाचा अधिरपणा आज... तरल त्या डोळ्यांना कळला...
अबोल भावनांचा थेँब आज...
सईच्या गालावरुन ओघळला...
ओंजळीत तिची आसवं झेलताना...
अलगद तो थेंब मनात भिनला...
.
.
पापण्यांची होणारी झापड...
आता मात्र बंद होती...
झुळझुळ वाहणाय्रा वाय्राची...
गतीही आता मंद होती...
.
.
ओंजळीत थेंब झेलण्याची...
माझी ही नवी रित होती...
आसवांसोबत भिजलेली...
गंधित ती प्रित होती...
.
.
वेचुन ते थेंब सारे...
केले मी तयांस शब्दबध्द...
हरवुनी आता तिझिया प्रितीत...
मी मात्र राहीलो निशब्द...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66

 :) very nice vijayaa n kavi  :) :)

मिलिंद कुंभारे

संतोषी ताई,
माणूस हा त्याच्या वयाने मोठा होत नसतो, पण त्याचे कर्तव्य, त्याचं अंतर्मन, दुसर्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन हे सर्व त्यास मोठे बनवतात. मला माहित होते तुम्ही माझ्यापेक्षा १० वर्षे लहान आहात, पण MK वर आपण moderator म्हणून आपले मार्गदर्शन देत असता त्यामुळे नुसतंच संतोषी असे संबोधणे मला योग्य नाही वाटले ... असो आपल्यात एक निखळ मैत्री पण असू शकते यांत शंकाच नाही .... यापुढे मी तुम्हाला नुसतं संतोषी असंच म्हणणार, अर्थात तुमची काही हरकत नसेल तर ....  :-\

हो आणि मी चीत्ररुपांत कविता कशी लिहावी हे आपल्याकडूनच शिकलोय आणि तेही फक्त MK वरच, त्याबद्दल मी आपला नेहमीच आभारी आहे ...
असंच मला आता लयबद्ध अश्या कविता लिहायला शिकायचे आहे बघू या कितपत यश मिळतंय ...  :)