चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

अरे मिलिंद, मला सुद्धा चित्र रुपात कविता कश्या लिहितात सांगा न ! :)

कवि - विजय सुर्यवंशी.

. .बंध शब्दांच्या नात्याचे . . .
.
.
.
संगतीने साय्रांच्या आपुल्या...
चारोळीची ही पंगत रंगली...
कुणी वेचली आसवं सईची...
तर कुणी तिची प्रित वर्णिली...
.
.
शब्द सारे मज कवेत आले...
सोबतीत आपुल्या गंधित झाले...
मिळाल्या आपल्या साय्रा प्रतिक्रिया...
अनं मज आभाळ ही आता ठेंगणे झाले...
.
.
शब्दांचा हा ठेवा जपला आपण...
अन माय मराठीचे बोल मिळाले...
सोबतीने आपल्या कळले गुज कवितेचे मजला...
अनं नात्यांचे बंध आज यमकछंदात मिळाले...
.
.
भावनाहीन आधी होतो मी...
परि आज काव्यसुमने गोळा केली...
मुक्या त्या मनाने आज...
शब्दाविनाच कविता केली...
.
.
भेदरलेल्या मनाचे भाव आज...
कवितेतुन आता सईला कळाले होते...
आर्त त्या भावनेला मग...
बळ शब्दांचे आज आले होते...
.
.
यमकछंदांच्या या जगती...
सारेच मनाला प्रिय आहे...
शब्दांच्या या नात्याचे...
सारेच मग मनाला साहे...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
         (यांत्रिकी अभियंता)

मिलिंद कुंभारे

कवि - विजय सुर्यवंशी,
छान .... :)

कल्लोळ शब्दांचा

पुरे कल्लोळ शब्दांचा,
पुरे खेळ भावनांचा,
मज वाटतसे आता,
छन्द, वृत्त यमकांचा,
ध्यास नुसता धरावा,
एक लिहावी कविता,
अन रचता कविता,
लय मिळावी शब्दांना,
सूर जुळता काव्याला,
मजा लुटावी गातांना...

मिलिंद कुंभारे

कवि - विजय सुर्यवंशी.

आभारी आहे मिलींद...

Madhura Kulkarni

#354
Nice!!!


कवि - विजय सुर्यवंशी,
छान .... :)

कल्लोळ शब्दांचा

पुरे कल्लोळ शब्दांचा,
पुरे खेळ भावनांचा,
मज वाटतसे आता,
छन्द, वृत्त यमकांचा,
ध्यास नुसता धरावा,
एक लिहावी कविता,
अन रचता कविता,
लय मिळावी शब्दांना,
सूर जुळता काव्याला,
मजा लुटावी गातांना...

मिलिंद कुंभारे



शब्दांत जन्म व्हावा,
कवितेत श्वास घ्यावा...
खोल मनात रुतावा,
असा ध्यास कवितेचा....

अर्थ मनास भिडावा,
नसानसांत भिनावा,
शब्द हि ना उरावा,
असा ध्यास कवितेचा....

मिलिंद कुंभारे

thanks madhura,

शब्दांत जन्म व्हावा,
कवितेत श्वास घ्यावा...

nice lines.... :)

sweetsunita66

शब्दांत जन्म व्हावा,
कवितेत श्वास घ्यावा...
खोल मनात रुतावा,
असा ध्यास कवितेचा....

अर्थ मनास भिडावा,
नसानसांत भिनावा,
शब्द हि ना उरावा,
असा ध्यास कवितेचा....wah! wah! madhura! :) :)

Madhura Kulkarni

#357
Thanks Sunita di, Milind da!

Madhura Kulkarni

काल सुचल्या दोन ओळी....

खोटे खोटे सारे काही
खरेपणा मज गवसत नाही,
का जगते या जगात अजुनी
मलाच माझे समजत नाही....

कवि - विजय सुर्यवंशी.


काल सुचल्या दोन ओळी....

खोटे खोटे सारे काही
खरेपणा मज गवसत नाही,
का जगते या जगात अजुनी
मलाच माझे समजत नाही....
.
.
जगाच्या त्या नित्य स्वभावाचे...
नको तु मनावर घेऊस...
प्रत्येक ओळ कर थेंबासवें गोळा...
जसा रिमझिम झरणारा पाऊस...
.
.
खोटे खोटे असले जरी...
क्षण ते सोबती राहु दे...
समजुन घेण्या या जगाला...
कविता तुझी वाहु दे...
.
.
जगण्याला स्वताच्या तु नको अव्हेरु...
कारण तुझ्यासाठी अजुनही कुणीतरी  जगतं आहे...
सुचणाय्रा तुझिया नित्य चारोळीस...
कविता कुणीतरी लिहीत आहे...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.     
        (यांत्रिकी अभियंता)