चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

Madhura Kulkarni

#370
सुनिता दी, इतरत्र धागे शोधण्यात वेळ जातो ग......इथेच कर ना तुझ्या नव्या कविता पोस्ट.....आम्ही वाचून रिप्लाय देऊ शकू ग. आणि एकाच धाग्यावर बर पडत! I hope you understand!!! Don't misunderstand me!!  :)

sweetsunita

धन्यवाद मधुरा आणि विजय !माझ्या काही कविता ?याच site वर पोस्ट  आहेत आणि हिंदी कवितांचा ब्लॉग पण माझ्या पोस्ट खालीच दिलेला आहे फ़क़्त क्लिक करा आणि प्रतिक्रिया द्या चांगल्या असो वा वाईट  नेहमीच स्वागत आहे

sweetsunita66

धन्यवाद मधुरा आणि विजय !माझ्या काही कविता[ ?]याच site वर पोस्ट  आहेत आणि हिंदी कवितांचा ब्लॉग पण माझ्या पोस्ट खालीच दिलेला आहे फ़क़्त क्लिक करा आणि प्रतिक्रिया द्या चांगल्या असो वा वाईट  नेहमीच स्वागत आहे
:) :)

कवि - विजय सुर्यवंशी.


धन्यवाद मधुरा आणि विजय !माझ्या काही कविता[ ?]याच site वर पोस्ट  आहेत आणि हिंदी कवितांचा ब्लॉग पण माझ्या पोस्ट खालीच दिलेला आहे फ़क़्त क्लिक करा आणि प्रतिक्रिया द्या चांगल्या असो वा वाईट  नेहमीच स्वागत आहे
:) :)
.
.
.

सुनीता, जरुर वाचेन तो ब्लॉग.....
.
.
हिंदी असो वा मराठी..
सदैव तैयार कवितेसाठी,..

sweetsunita66


Madhura Kulkarni

नाही सरळ हि वाट,
कधी झाडी घनदाट...
कधी काट्यांच्या पायघड्या,
कधी पाकळ्यांची भेट....

आज ठरवून टाक,
येशील कि नाही,
टाळून विषय
आज पळायचे नाही....


sweetsunita66

नाही सरळ हि वाट,
कधी झाडी घनदाट...
कधी काट्यांच्या पायघड्या,
कधी पाकळ्यांची भेट....

आज ठरवून टाक,
येशील कि नाही,
टाळून विषय
आज पळायचे नाही...welcome back,madhura  :)

फारच छान चारोल्या ,,, :) :)

खरेच असे अवघड ही वाट जरी ,
काव्याच्या पूजाऱ्यांना असे गोड तरी ,
कधीही आळस नाही वेळ असो कुठलीही ,
काव्यासंगे हि प्रीत सदा फुलत राहे उरी  :) :)sunita

मिलिंद कुंभारे

#377
मधुरा ताई
ती चारोळी कुणासाठी ????

गूढ जीवनाचे

वळणे जीवनी
कितीच असती
कधी  साधे सोपे
काही आड रस्ते

कंपने  धरणी
उधाण सागरी
भय ते मृत्यूचे
मज क्षणोक्षणी

कधी वाटतसे
स्वच्छंदी जगावे
घ्यावे ठरवून
आयुष्य आपले

गीत जीवनाचे
तुजसवे गावे
गूढ जगण्याचे
उमजून घ्यावे

मिलिंद कुंभारे


मिलिंद कुंभारे

sweetsunita,

अशीच प्रीत सदा फुलत राहू दे...... :)

Madhura Kulkarni

#379
मिलिंद दा,
माझी इंजिनीअरिंगला जातानाची माझी मनोवस्था होती ती.... :D
बाय द वे, मी लहान आहे रे दादा तुझ्या पेक्षा...मला 'मधुरा' म्हण.....'ताई' नको. :)
तुझी कविता चांगली आहे.
_____________________________________________________
_____________________________________________________


सुनिता दी,
      :-*
    धन्यवाद!  :) 
तुझीही चारोळी छान होती....
आता मी....



दुनियेत हि साऱ्यांची
भलतीच दुनियादारी,
काट्यांचे कुंपण
त्यात मन कळीपरी...

कवितेस पुन्हा आज
लपेटून घ्यावे...
कल्पनांचे विश्व
नव्याने फुलावे....