चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

भावनाविश्वी रमताना या...
कुणाची याद ठेवु नको...
सुगंध वेचताना गुलाबाचा...
अस्तित्व काट्याचे विसरु नको...
जिवनपटाच्या या कठपुतल्या आपण...
परि भाव मनाचा विसरु नको...
हे चांदणे शिँपताना तु...
किरणाच्या मोही अडकु नको...

Madhura Kulkarni

खूप छान, विजय.

मोह न धरला, कधी कशाचा
सारे सारे टाळत गेले,
आशांचे अन इच्छांचे,
मनोरे मनी जाळत गेले....

हरवले हातून सगळे,
आश्रू भूवरी ढाळत गेले,
कल्पनेच्या फुलांचे गजरे
केसांमध्ये माळत गेले.....

कवि - विजय सुर्यवंशी.

व्यर्थ न जातिल...
आसवं ही ढाळलेली...
अनुभवाने जाहली दुर...
आमिषं तु टाळलेली...
या साय्रा त्या यत्नानं...
गंधित फुलं गजय्रात तु माळलेली...

मिलिंद कुंभारे


कवि - विजय सुर्यवंशी,

खूप छान.... :)

हे चांदणे शिँपताना तु...
किरणाच्या मोही अडकु नको...

Madhura Kulkarni

मिलिंद दा, तुझी चारोळी कुठे आहे?

चल, मीच लिहिते....

सांगून बसले गुज मनीचे,
असे कसे या अवचित वेळी,
सरीवर सर, पावसाची झड,
हि तर निसर्गाचीच खेळी....

धुंदित क्षण हे मोहरलेले,
दव बनुनी हळू पाझरलेले,
आता शुद्ध मी हरपून बसले,
मनातले मज काही गवसले.....

मिलिंद कुंभारे

Madhura,
खूप छान.... :)

शब्दच गोठले
थिजल्या भावना
नाही गवसत
आता सूर नवे
लिहू काय सखे  ......

संपली पायवाट
रस्ते लांब लांब
विरलित स्वप्ने
धुंदीत क्षण ते
सखी शोधू कुठे ......

Madhura Kulkarni

मिलिंद दादा,
  चांगला आहे मुक्तछंद!



कवि - विजय सुर्यवंशी.



कवि - विजय सुर्यवंशी,

खूप छान.... :)

हे चांदणे शिँपताना तु...
किरणाच्या मोही अडकु नको...
.
.
.
.
thanks milind.

कवि - विजय सुर्यवंशी.


Madhura,
खूप छान.... :)

शब्दच गोठले
थिजल्या भावना
नाही गवसत
आता सूर नवे
लिहू काय सखे  ......

संपली पायवाट
रस्ते लांब लांब
विरलित स्वप्ने
धुंदीत क्षण ते
सखी शोधू कुठे ......
.
.
.
.
milind mastach...... thet bhidlya bhaavanaa.



Madhura Kulkarni

म्हणतात लोक सारे,
तू नाहीस आता माझी....
एकांत चिडवून जातो,
तू नाहीस आता माझी....

पण अजूनही मात्र
तुझाच आहे मी...
परतून ये केव्हाही,
तुझाच आहे मी....