चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

भावनाविश्वी रमताना या...
कुणाची याद ठेवु नको...
सुगंध वेचताना गुलाबाचा...
अस्तित्व काट्याचे विसरु नको...
जिवनपटाच्या या कठपुतल्या आपण...
परि भाव मनाचा विसरु नको...
हे चांदणे शिँपताना तु...
किरणाच्या मोही अडकु नको...


        शब्दच गोठले
थिजल्या भावना
नाही गवसत
आता सूर नवे
लिहू काय सखे  ......

संपली पायवाट
रस्ते लांब लांब
विरलित स्वप्ने
धुंदीत क्षण ते
सखी शोधू कुठे ......



मस्तच आहे..... मिलिंद,विजय  आणि मधुरा .... :) :) :)
दुनियेत हि साऱ्यांची
भलतीच दुनियादारी,
काट्यांचे कुंपण
त्यात मन कळीपरी...

कवितेस पुन्हा आज
लपेटून घ्यावे...
कल्पनांचे विश्व
नव्याने फुलावे...

sweetsunita66

वनवास हा दुराव्याचा क्षणात आता दूर व्हावा 
कवितेच्या  फुलांना  आता काव्य वेलींवर बहर यावा
नाही चालणार  आता कुचराई न कोणाचा बहाणा
झटपट मधुरा, मिलिंद ,अन विजय चारोळ्यांचा प्रसाद द्या ना  :) :) :)

Madhura Kulkarni

राजवाडे, अन बगीचा
सारे फक्त भास होता...
सीतेच्या कपाळी फक्त
रामासोबत वनवास होता...

कवि - विजय सुर्यवंशी.

#393

राजवाडे, अन बगीचा
सारे फक्त भास होता...
सीतेच्या कपाळी फक्त
रामासोबत वनवास होता...
.
.
.
.

छान  चारोळी जमली  आहे...
.
.
.
भोगलेल्या वनवासा नंतर.....
नच  जाहले दूर ते अंतर.....
आजन्म शाप हां का भोगते सीता...????
पुरुशोत्तमाविना  निरंतर !!!!!


संशयाने विटले सारे  मन.....!!!
तिलाच दोषी मानती हे जन.....!!!
मानली जिला सोबती मनाने .....
परि शाप का भोगावा  एकटीने ....????

Madhura Kulkarni

खूप छान विजय, खूप छान!

विश्वासाच्या आगीमध्ये
होरपळल्या कितीक सीता,
समजातल्या रामानेही,
पाठ फिरवली बघता-बघता....

sweetsunita66


sweetsunita66

मधुरा ,विजय आता माझी बारी ...............। :)
    कनकाहूनही शुद्ध आहे सीता जाणीव रवणालाही असे
    पण राक्षसी श्रापातून मुक्त होण्या रावण धडपडत असे
    मिळाला त्याला राम नामाचा अमृत कुंभ म्हणून
    सीतेच्या अपहरणाची लीला रचली रावणाने जाणून  :) :) :)

मिलिंद कुंभारे

#397
सीतेचे अपहरण झाले तेव्हा रामाने कदाचित अश्या भावना व्यक्त केल्या असाव्या ......

कुठे कुठे शोधू तुला
रिता सारा आसमंत
तारकाहि मंदावल्या 
शांत सागरी किनारा ....

सुना सुना राजवाडा
कोमेजला पारिजात 
ओढ तुज मिलनाची
कि पाठलाग नुसता ......

निळ्याशार डोळ्यांत ह्या
समुद्र उधाणलेला
शोधू कुठे चोरवाटा
तळ तुझा गाठणाऱ्या ....

ध्यास तुझाच धरशी
मन माझे वेडेपिसे
तुझी चाहूल म्हणावी
कि हुरहूर नुसती ......

Madhura Kulkarni

खूप छान मिलिंद दादा आणि सुनिता दी.....
_____________________________

सीतेच्या मनातील भावना.....

सावली तव बनून राहिले,
वनातही मी केली सोबत,
तुझ्याचसाठी राज्य सोडले,
वनवासी झाले वाटा तुडवत.....

सोडून आले मागे मागे,
हक्काची माझ्या सारी दौलत,
बनून राहिले फक्त तुझी,
जरी नव्हती तुजला काही मिळकत....


सुंदर होते वैभव त्याचे,
सोन्याने लंकेला मढले,
तरही त्याला नाही भुलले,
पावित्र्य मी अफाट जपले

सोडवायला घेऊन सेना,
आलास तू जेव्हा तिथे,
भासले ते प्रेम होते,
धाऊन आले जे इथे....

पण घातलास घाव तू
विश्वासाचे तुकडे झाले,
अग्निपरीक्षा दिली मी जरी,
तुझेच मन रे कलुषित झाले....

sweetsunita66

फारच छान मधुरा आणि मिलिंद  :) :)