चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

फारच छान....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

sweetsunita66

धन्यवाद!!!!!

मिलिंद कुंभारे

मायमाउली तू , माझी मायमराठी,
अवीट तुझी गोडी, अजरामर तुझी थोरवी,
सकलजनी, मनोमनी तू सदैव चिरंजीवी,
संपवी तुज ऐसा, त्रीलोकांत कुणी नाही!

शिवाजी सांगळे

मिलींद, खरच आहे, माय मराठीला कुणीच संपवू शकणार नाही. सार्थ अभिमान आहे सर्वांना....
तसेच मी तयार केलेला विडीयो पुढील लिंक वा फेस बुक वर जरूर पहा... http://www.youtube.com/watch?v=LsH_sFmf9f0
धन्यवाद !
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Madhura Kulkarni

वाह!!! धन्यवाद सुनिता!!!

 

धन्यवाद शिवाजी !!
   मिलिंद अन मधुरा mk चे दोन नगीने
   एक स्वाध्यायात गुंतली दुसऱ्याचे  कार्यालयीन देणे 
   तरी,कवितांचा आस्वाद देतात आपल्याला
   सृजनशील जबाबदारी प्रस्तुत करुनी आपुलकीने
   


Madhura Kulkarni

#455
 जाऊ कुठे कशी मी?
चहूकडे पहारे...
गजाआड एकटी मी,
अंगावरी शहारे..

पिंजऱ्यात बांधून मजला, शोपीस नका हो बनवू.....
सांगा किती कसे मी, आता तुम्हाला विनवू???

उडण्या आकाशी मी, घेतली भरारी....
सोडून आज आले, दुनिया ती विषारी......


-मधुरा

शिवाजी सांगळे

वा, मधुरा, छान लिहिलस...
माझ्या "माझी मुंबई" या कवितेवर आधारित विडीयो you tube वर पुढील लिंक वर पहा वा फेस बुक वर shivaaji sangle search करून जरूर पहा, व तुझा अभिप्राय जरूर कळव. http://www.youtube.com/watch?v=LsH_sFmf9f0 एकेरीत उल्लेख केल्या बद्धल राग मानू नकोस, मोठा भाऊ म्हणून सांगत आहे.
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

sweetsunita66

 जाऊ कुठे कशी मी?
चहूकडे पहारे...
गजाआड एकटी मी,
अंगावरी शहारे..

पिंजऱ्यात बांधून मजला, शोपीस नका हो बनवू.....
सांगा किती कसे मी, आता तुम्हाला विनवू???

उडण्या आकाशी मी, घेतली भरारी....
सोडून आज आले, दुनिया ती विषारी......
    very nice MADHURA...
.
.

फुल उमलण्या आधी ,
कुणी हो कुस्करले .
उघडे आकाश बघण्याचे ,
स्वप्न कुणी हो चोरले ?
का सावित्री अन अहिल्या ,
पोरक्या झाल्या जगी ?
का मुलींचा जन्म ,
यक्ष प्रश्न वाटे उगी .
मातेची मायेची ऊब ,
असे कसे हो सर्व  विसरलेत ,
बहिणीची वेडी माया ,
असे कसे हो परके केलेत ?
जर ,यांच्या साठी मनाच्या कप्प्यात ,
जागा असेल बर का  जराशी ,
तर ,जन्मणारी कन्या ,
माय बहिणच असेल ना उद्याची .
का आपल्याच हाताने ,
मारताय पायावर कुऱ्हाडी
जर जगात स्त्रीच नसेल ,
वंश वाढीला लागेल ना बेडी
आपल्याच मानव जातीचा ,
समूळ नाश कराया निघाले
विनाश काले विपरीत बुद्धी ,
हेच का सिद्ध करण्यास निघाले  ???         
                                            सुनिता
                                                    ७डिसेंबर १३

शिवाजी सांगळे

सुनिता, छान भावनाप्रधान कविता... अभिनंदन
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

sweetsunita66

 :) :) :) :)धन्यवाद :) :) :) :) :) :)