संस्कार

Started by केदार मेहेंदळे, March 06, 2013, 11:41:48 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

जे संस्कार दिले ते घेतले
जे घेतले ते संस्कार रुजले
जे संस्कार रुजले ते वाटले
जे वाटले ते संस्कार टिकले  :)

केदार.....

Madhura Kulkarni

मनावरी माझ्या,
संस्कारांचे राज्य |
वर्तन ठेवाया शुद्ध,
सतत असतात सज्ज ||

कशी वाटली माझी चारोळी?

केदार मेहेंदळे

#2
chan.....

आयुष्यभर पुरणारी
वाटूनही  उरणारी
संस्कारांची शिदोरी
कधीही न संपणारी


  केदार.....

Madhura Kulkarni

#3
ह! मस्त!!!

ते च खरे संस्कार....
हरपून कधी देत नाही भान
पुरुष सुद्धा देतो जेथे स्त्रीला सन्मान

ते च खरे संस्कार.....
पैसा जरी हाती, तरी आहे विनम्रता
मातेलाही जेथे मानती देवता

कशी वाटली?

केदार मेहेंदळे

 

छान..........

तेच खरे संस्कार
सुटता जे सुटत नाहीत
कितीही आला  राग तरी
पूजा केल्या शिवाय रहावत नाही


केदार.....

Madhura Kulkarni

माथा हा झुकतो,
कायम विनयाने....
वागवतो आम्ही
सर्वांसी मानाने......

केदार दादा,
आपण कुठेही कवितांच्या भेंडयाच सुरु करतो नै???
पण मस्त मजा येते......
LET US CONTINUE!!!!!
:)

केदार मेहेंदळे

समजू नये तरीही
कुणी आम्हाला बावळा
टवाळा पाठी जोरदार
घालू आम्ही सोटा   >:(


केदार.......

Madhura Kulkarni

समजू नये तरीही
कुणी आम्हाला बावळा
टवाळा पाठी जोरदार
घालू आम्ही सोटा   >>>>>> यमक कुठे आहे भाऊ?

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

असो.....


खबरदार कुणी जर, 
बोलले काही पाठी
कळले तसे आम्हा तर,
नाठाळाचे माथी हाणू काठी.
>:( >:( >:( >:( 

केदार मेहेंदळे

ha ha ha... chukalach :(

ata chan jamal! :)