दूर अशी जातांना

Started by Sadhanaa, March 06, 2013, 12:13:58 PM

Previous topic - Next topic

Sadhanaa

दूर अशी जातांना तूं
   वळून मागें पाहू नको
जीवनाच्या गोड स्मृति 
   संगे मात्र नेऊ नको ।
त्या स्मृतींच्या आधारे 
   जीवन हें जगवायचे
आठवणींत गुंगून त्या 
   विरहदुःख विसरायचे ।
जीवनांतले स्मृति पापूद्रे 
   रोज रोज निघतात
तुझ्या अभावे झालेल्या 
  जखमा मात्र वहात रहातात ।।  रविंद्र बेन्द्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this         
http://www.kaviravi.com/2013/02/love-poem_26.html

Ankush S. Navghare, Palghar