ओझं..

Started by Rohit Dhage, March 10, 2013, 11:55:29 AM

Previous topic - Next topic

Rohit Dhage


उगाच सुंदर बाहुल्या हातात घेऊन मिरवायच्या
का तर बोलायला कुणी नाही
एखादं नातं आपण फुल म्हणून जपायचं
आणि पुढच्याची पुतळ्याची भूमिका असायची
आणि तरीही आपण चालवून घ्यायचं
का तर सोबत कुणी नाही
आणि उगाचच का निभवत राहायची मग
फक्त मिरवायची म्हणून पाठीवर वाहत राहायची
हि असली रस नसलेली, कस नसलेली नाती
मग निभवायची तरी कशाला
जर कागदोपत्रीच नसतील तर
द्यायचे तोडून मग पाश उरलेसुरले
आपणच आपल्याभोवती बांधून घेतलेले
आपण पण व्हायचं मोकळं
त्रास.. त्रास तर असलेल्याचाही होताच कि
नसलेल्याचाही होतो का आजमावून तर पहा
मन तर वेडंच होतं ते, त्याला थोडं समजावून तर पहा
आठवण साठवण करतंच आलास
आठवणीत तर आयुष्य बरबटून गेलंय,
थोडं जमलं तर विसरून पण पहा
आणि जमलं एवढं सगळंच तर एवढं कळून रहा
दुखतातच असली दुखणी तर इथून पळूनच रहा
आणि तेवढीच राखून ठेवशील मग
जी तुला रोज उशाला लागतील
जी तुझ्या रोज उशाला असतील..

- रोहित

केदार मेहेंदळे


Rohit Dhage


मिलिंद कुंभारे


रोहित

नाती असतातच अशी!
कधी वाटतात ती ओझी!
तर कधी वाटतात ती हवीहवीशी!

छान कविता आहे

मिलिंद कुंभारे

केदार मेहेंदळे

#4
असं म्हणतात
जे आपलं ना, ते
ते नाते................

सहज गम्मत  ;)

milind kumbhare

नाती असतात नीरनिराळी !
अन;
ती जपण्याची तऱ्हा ही  नीरनिराळी!

कधी असतात ती  फुसकी
जुळतात मुळी तुटण्यासाठी!
कधी असतात ती असली!
नकळतच जुळतात ती;
कधीही न तुटण्यासाठी!

मिलिंद कुंभारे

Rohit Dhage

doghanchahi chan prayatna  8) :D