निर्जीव लाकडी कठडा

Started by Sadhanaa, March 18, 2013, 10:03:50 PM

Previous topic - Next topic

Sadhanaa

निर्जीव लाकडी कठडा तो
फारच नशिबवान आहे
माझ्यासारख्या पाहणार्यास
त्याचा हेवा वाटत आहे ।

कधी रेखीव धनुष्याचा
ओझरता त्या स्पर्श होतो
कधी गालांच्या पावडर चा
त्याला मधुर गंध मिळतो ।

कधी दोन कबुतरे अवखळ
हळुच त्यावर येऊन बसतात
अन अतृप्त हृदयाची
धडकन त्याला ऐकवतात ।

सळसळते वाऱ्याने साडी
त्यावर येऊन विसावते
कुंतलाची बट एखादी
हळुवार गुदगुल्या करते ।

कधीं स्पर्श मादक तो
एक आगळी धूंद देतो
कधीं करुण स्पर्श तों
हृदयाची व्यथा सांगतो ।

दृष्य हे जीवघेणे
समोर कायम दिसत आहे
म्हणून त्या कठड्याचा
हेवा मला वाटत आहे  ।।
रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2012/11/blog-post_4519.html