कविता copy paste, चोर बाजार

Started by मिलिंद कुंभारे, March 19, 2013, 01:26:48 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

प्रिय रसिक मित्रानो!

माझी कविता "अबोल प्रीत", जी fb वर पोस्ट केलेली आढळली त्याबद्दल मी शहानिशा केली असता मला MK च्या खूप कविता त्यात पोस्ट केलेल्या आढळल्या! "फक्त तुझ्या एकटीसाठी या जगात आज जगात आहे" ह्या शीर्षकांतर्गत त्या सर्व कविता संग्रहित केलेल्या बघितल्यात. मी fb वर जाऊन त्याबद्दल comment केले असता निलेश पाटील या मुलाने कविता नकळतपणे पोस्ट केल्याचे कबुल केले व माफीही मागितली! मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण मला वाटतं ह्या मुलाला कविता copy paste करण्याचा छंदच असावा.त्याच fb  वर मी चोर बाजार copy paste असाही एक page बघितला!
पण हे जे तो करतोय तेव्हा तिथे तो कुठल्याच कवितेचे शीर्षक व कवीचे नाव टाकीत नाही ह्याची मात्र खंत वाटते!

आपण सर्वांनी मिळून यावर काही तोडगा काढता येईल का ते विचारात घेतले पाहिजे!

मिलिंद कुंभारे  :P :P :P

केदार मेहेंदळे



kuldeep p

इथे कोणाला बोलून काहीच फायदा नाही

आणि इथल्या मोठ्या कवींना काहीच फरक पडत नाही कारण त्यांच्या दिवसाला ५-६ कविता सहज बनतात

पण फरक पडतो तो फक्त आपल्या सारख्या लहरी कवींना कारण आपली एक कविता पण मुश्किल ने बनते


मी या साठी भरपूर जणांची हेल्प घेण्याचा प्रयत्न केला पण काहीच फायदा नाही

मी नावं नाही घेणार पण आपल्या mk वरच्या काही सिनिअर कवींची हेल्प पण मागितली पण काहीच फायदा झाला नाही


इथलं admin पण आपली साथ देत नाही

:(

मिलिंद कुंभारे

मित्रा
बरोबर आहे! म्हणतात ना जितकी मानसं तितक्या वृत्ती!
केदारजी म्हणतात तसे आपण प्रत्येकाची वृत्ती बदलू शकत नाही!
पण प्रयत्न तर नक्कीच करू शकतो!
आपण आपल्या लेखणीतून अशा लोकांना जास्तीत जास्त प्रबोधन केले पाहिजे!
फार नाही पण थोडा तरी प्रभाव पडेल!
आजच्या जगात तंत्राध्यान इतक प्रगल्ब झालंय कि आपण काहीही मग ते साहित्य असो कि फोटो सहज कॉपी पेस्ट करू शकतो, कुठेही share करू शकतो!
एका दृष्टीने त्याचा आपल्याला फायदाच होत असतो, आपल्या भावना खूप लोकांपर्यंत पोहोचवू शकतो!
आपण लिहितो ते स्वतःचा छन्द म्हणून! पण त्या भावना कोणी आपली दखल न घेता कॉपी पेस्ट करत असतो याची मात्र खंत वाटते! :( :( :(

मिलिंद कुंभारे  :) :) :)

kuldeep p

मित्रा कविता share करण्याबाबत काहीच प्रॉब्लेम नाही पण ज्याची कविता आहे त्याचे श्रेय त्याचे नाव टाकून त्याला द्यायला हवे ना

मिलिंद कुंभारे

अगदी बरोबर आहे! पण असे होत नाही याचीच खंत आहे!
म्हणून उदास तू होऊ नकोस अन नवीन नवीन कविता लिहायचं तू सोडू नकोस!
तुझी कविता जरी कुणी चोरली तरी त्याची खंत मनी बाळगू नकोस!
तुझ्या लेखणीतून मराठी साहित्य संमृद्ध होत असतं हे तू विसरू नकोस! :) :) :) :) :) :) :) :) :) :)


santoshi.world

@ मिलिंद कुंभारे :
यावर उपाय एकच आहे मित्रा, तुझी कविता चित्रस्वरूपात पोस्ट कर. हे copy paste बहाद्दर एवढे आळशी असतात कि ते तुझी कविता type करून स्वत:च्या नावावर खपवण्याची तसदी घेणार नाही... हा पण तुझे नाव त्यावर अश्या ठिकाणी टाक कि ते कुणी crop करू शकत नाही... किंवा तुझ्या नावाचा watermark पूर्ण कवितेवर येवू दे ..... म्हणजे copy paste बहाद्दरांना थोडा आळा बसेल..

@ praajdeep :
MK मोठे कवी आणि छोटे कवी असा भेद कधीही करत नाही मित्रा ... एक कवयत्री म्हणून तुझे खालील वाक्य मला थोडे खटकले..
"आणि इथल्या मोठ्या कवींना काहीच फरक पडत नाही कारण त्यांच्या दिवसाला ५-६ कविता सहज बनतात
पण फरक पडतो तो फक्त आपल्या सारख्या लहरी कवींना कारण आपली एक कविता पण मुश्किल ने बनते."
जाणूनबुजून ठरवून कधी कविता करता येत नाही रे ... ती आपोआप सुचावी लागते... काहीच्या दिवसाला ५-६ कविता सहज बनतात कारण ते कविता जगत असतात.. आपण फक्त आपल्या प्रेमावरील अनुभववरच कविता करत असतो,     त्यांच्यावर विषयाचे बंधन नसते.. ते कशावर हि कविता करू शकतात.....

इथले सिनियर कवीं तुझी काय मदत करणार ते स्वत:च ह्या प्रकाराला बळी पडलेले असतील आणि ह्यावर उपाय शोधत असतील ...

MK admin स्वत: कवी नसून हि त्याने हि site बनवली आणि आपल्या सारख्या अनेक नव कवींना व्यक्त होण्याचे एक माध्यम दिले. यावर  काही उपाय असताच तर त्याने नक्कीच अमलात आणला असता ... त्यामुळे admin साथ देत नाही असे समजू नका ......

हा प्रतिसाद एवढ्याच साठी कि इथे कोणी कोणाला हि दोष देवू नका .... प्रत्येकाने स्वत:ची मदत स्वत:च करावी ...  तुमच्या कविता चित्र स्वरुपात watarmark सकट पोस्ट करा... may be ह्या प्रकाराला थोडा आळा बसेल.

मिलिंद कुंभारे


मी तुमच्या मताशी अगदी सहमत आहे!

कविता चित्रस्वरूपात पोस्ट करने हा एक उपाय असू शकतो!

जाणूनबुजून ठरवून कधी कविता करता येत नाही रे ... ती आपोआप सुचावी लागते... काहीच्या दिवसाला ५-६ कविता सहज बनतात कारण ते कविता जगत असतात..

आपले हे विचार आवडलेत!

धन्यवाद  :) :) :)

मिलिंद कुंभारे

संतोषी ताई!

आपण सुचवल्या प्रमाणे मी माझी कविता चित्ररुपात लिहायचा प्रयत्न केला!
पण मला ते जमत नाही आहे! online कविता type करताना ती चित्ररुपात कशी type करावी हे मला व MK वरील वाचकांना कुणी मार्गदर्शन केलेत तर बरे वाटेल!

तसेच आपण watermark कवितेवर चीटकवावा असेही सुचवले! मला वाटतं MK admin ने ह्यात पुढाकार घेऊन एक MK चाच permenant watermark online कविता type करतानाच किंवा कविता पोस्ट करतानाच चीटकवावा असे वाटते!
कदाचित प्रत्येकालाच MK चा watermark आपल्या कवितेला चीटकलेला आवडणार नाही! तर त्यासाठी option पण ठेऊ शकतो, जसे कविता पोस्ट करताना ज्याला MK चा watermark चीटकवावासा वाटत असेल तर त्याने तो option select  करावा! असे केल्यास कविता पोस्ट करणारयाला जास्त त्रास होणार नाही व copy paste चोरांपासून कविता चोरी होण्याचे प्रकार काहीश्या प्रमाणात कमी होतील!
MK admin ने ह्याचा विचार करावा असे मला वाटते!

मिलिंद कुंभारे! :( :( :(