------- प्रवास ---------

Started by Ambarish Deshpande, March 20, 2013, 08:43:11 PM

Previous topic - Next topic

Ambarish Deshpande

नुसते वाहत जाणे म्हणजे जगणे नाही
वाहत जातो म्हणुन त्याचे हरणे नाही
प्रवास आहे तुझा नि त्याचा पूर्ण वेगळा
अन सरणावर काहीच मागे उरणे नाही
जे नशिबाचे काटे बोचक रुतले आहे
तुझ्या कपाळीसुद्धा ते सांगितले आहे
जरी घेतले नाव वेगळे तुझ्या सुखाने
त्याच्या नशिबी आले तेही दुज्या रुपाने
आकाशाचा रंग निळा जो त्याच्यासाठी
समुद्रातला रंग तुझाही बदलणे नाही
अन सरणावर काहीच मागे उरणे नाही

अंबरीष देशपांडे

केदार मेहेंदळे