कविता कशी लिहावी!

Started by मिलिंद कुंभारे, March 23, 2013, 10:14:14 AM

Previous topic - Next topic

shashaank

An excellent example of ashtaaxaree by K. Anjali.

वेळी अवेळी मनात
असा भेटतो पाऊस
वर दाटूनी नभांत
पडे उन्हात पाऊस

वारा पिंजारतो जसा
उगा ढगांचा कापूस
वर दाटूनी नभांत
पडे उन्हात पाऊस

झाड सरीस म्हणते
थांब नको ना जाऊस
गहिवरुन केव्हांचा
पडे उन्हात पाऊस

अशी आल्हादली माती
पोटी अत्तर सुवास
वर दाटूनी ढगांत
पडे उन्हात पाऊस

shashaank

#11
3] अजून एक सोपा फॉर्म - अभंग -
सुंदर ते ध्यान | उभे विटेवरी | कर कटावरि | ठेवोनिया |
६-६-६-४ अक्षरे, पण यमक फक्त दुसर्‍या व तिसर्‍या चरणालाच लागू होते.

माझीच एक रचना देत आहे -

असे उजाडावे | मनाच्या क्षितीजी |
नुरावी काळजी | नावालाही ||

लख्ख व्हावे सारे | हृदय गाभारी |
प्रकाशाची झारी | बरसावी ||

मोकळे मोकळे | होताच आकाश |
कुठला आवेश | नसो तेथे ||

स्वैर वारा वाहे | किंवा झरा मुक्त |
व्हावे बंधमुक्त | चित्त तसे ||

असावा तयात | प्रेमाचा ओलावा |
सुखाचा गारवा | सदोदित ||

हीच एक आस | मनी तोचि ध्यास |
न करी उदास | जगदीशा ||



मिलिंद कुंभारे

सशांक,
फारच छान माहिती दिलीस ... नवीन कवींना हि फार उपयोगाची वाटते ....
मीही अशी कविता लिहायचा प्रयत्न करतो .... मला जमलंय कि तुला कळवतो ...
धन्यवाद ...

1] एक साधा सोपा फॉर्म - अष्टाक्षरी - एका ओळीत आठ अक्षरे -

2] साधा सोपा - ओवी फॉर्म - ॐ नमोजी आद्या | वेद प्रतिपाद्या | जय जय स्वसंवेद्या | आत्मरुपा ||
६ - ६ - ६ - ४ - प्रत्येक चरणाच्या शेवटी येणारे अक्षर हे यमक.

मिलिंद कुंभारे



बेधुंद मी बेधुंद तू
बेधुंद ती पाने फुले
भन्नाट वाहती वारे
सांग सखी छेडू कसे
तुझ्या प्रीतीचे तराणे

सशांक,
मला जमलंय का सांग बघू .... :-\

shashaank

#14
सांग सखी छेडू कसे
तुझ्या प्रीतीचे तराणे yaa donach olee layeet aahet, tyaavareel olee ashtaaxaree asoonahee layeet mhaNataa yet naaheet - too mhaNoon bagh


tasech, ekaa kaDavyaat chaar charaN / oLee aavashyk aahetach.

मिलिंद कुंभारे

 :) :) :)
स्तब्ध सारी राने वने
बेधुंद ती पाने फुले
सांग सखी छेडू कसे
तुझ्या प्रीतीचे तराणे

सशांक,
आता जमलंय का सांग बघू .... :(

shashaank

स्तब्ध सारी राने वने
बेधुंद ती पाने फुले
सांग सखी छेडू कसे
तुझ्या प्रीतीचे तराणे >>>> हे बर्‍यापैकी जमले आहे -अजून प्रयत्न केलास तर
तो बेदुंध ऐवजी दोन अक्षरी किंवा चार अक्षरी शब्द जास्त सूटेबल होईल.
उदा.
बेदुंधशी पाने फुले - असे काही तरी....
पण खूपच चांगली जाण आलीये तुला (टेक इट लाईटली... )

मिलिंद कुंभारे

'मात्रा' च्या आधारावरही गझल होऊ शकते
ज्या प्रमाणे कवितेला यमक असण्याचा नियम असतो, तसच गझलेला 'मात्रे'चा नियम असतो.
शब्दांतील अक्षरांचा प्रकार ओळखून त्याच प्रकारच्या अक्षरांची मांडली दुसऱ्या ओळीत  करायची.

यात अक्षराचे प्रकार दोन....

१) लघु - म्हणजे काना-मात्रा, उकार-अनुस्वार नसलेली अक्षरे.....
           उदा: अ, ब, क, ड
आणि पहिली वेलांटी , पहिला उकार असलेली अक्षरे.
           उदा: हि, तु

२) गुरु - कान -मात्रा, दुसरा उकार, दुसरी वेलांटी असलेली अक्षरे...
           उदा: तू, जी, मी
आणि जोडाक्षरे....
           उदा: स्वास्थ्य

गझल मध्ये "काफिया" आणि "रदीफ" काय असते ह्यावर थोडी माहिती ....

संदर्भ :

"तुज बघता सारा हिशेब चुकला होता
मी अमावास्येला चंद्र पाहिला होता

तो एकच झाला गुलाब अवघा लाल
जो ओठांवरती तुझ्या टेकला होता

तालात नादली तुझी पैंजणे तिकडे
हृदयाचा ठोका इकडे हुकला होता

डोळ्यात अचानक उभ्या जळाच्या लाटा
मी डाव प्रीतीचा पहिला शिकला होता

निथळता चांदणे असह्य अंगावरती
मी चंद्र तुझ्या वस्त्राने टिपला होता

तू मिठीत घेता श्वास थांबले होते
मज मारायचा डाव चांगला होता

पाहिले जयाने तुझे लाजरे हासू
माणूस तो आयुष्यातून उठला होता

चढणार होते जहर तुला हे माझे
मी कवितेतून दंश ठेवला होता"

वरील संदीपच्या गझलेत 'चुकला' 'पाहिला' 'टेकला' 'चांगला' 'ठेवला' ह्याला "काफिया" म्हणतात आणि मतल्यात ते दोनदा आले आहेत. काफियाचे अनेकवचन "कवाफी" आहे. "होता" जो शब्द आहे त्याला "रदीफ" म्हणतात जो मतल्यात दोनदा आला आहे आणि प्रत्येक शेरामध्ये शेवटी आले आहे. रदीफ हे पूर्ण गझलेत कधीही बदलत नाही.
मतल्यात गझलेची जमीन(मात्रा) निश्चित होते आणि ती पूर्ण गझलेत कधीही बदलत नाही. प्रत्येक काफियाचे "अलामत" सुद्धा निश्चित असते जसे कि वरील गझलेत  'उठला' 'ठेवला' 'चांगला' 'टिपला' हे काफिया आहेत त्यात प्रत्येक काफियाचा शेवट हा "ला" हे यमक आहे. "ला" च्याआधी "अ" हे स्वरचिन्ह आहे(अलामत म्हणजेच स्वरचिन्ह होय).

this information is shared from Madhura Kulkarni's poem "गझल" her comments & reply from प्रसाद पासे....

मिलिंद कुंभारे

तरी मला वाटलेच त्या ओळींमध्ये काहीतरी चुकते  आहे ....
पण खरच मज्जा आली शिकायला ....
(टेक इट लाईटली... )  :D :D :D
I never mind it.....
हे असंच शिकायचं असते ....
आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल आणि दुसरा कोणी आपल्याला ती शिकवू बघत असेल तर त्यात माणसाने स्वतःचा कमीपणा मानून घेऊ नये ......

Thanks Shashank & I expect some more tips from you on this link so that every newbie can learn to write poems..... :)


sweetsunita66

 अरे मला पण शिकवा न कविता कश्या करतात ,मी तर लिहितांना काहीच विचार करत नाही जे मनात आलं ते कागदावर उतारते ...सुनिता  :)