कविता कशी लिहावी!

Started by मिलिंद कुंभारे, March 23, 2013, 10:14:14 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

sweetsunita,

1] एक साधा सोपा फॉर्म - अष्टाक्षरी - एका ओळीत आठ अक्षरे -

अरे संसार संसार
जसा तवा चुल्यावर
आधी हाताला चटके
तेव्हा मिळते भाकर ---- इथे लयीला महत्व आहे - त्याप्रमाणे यमकाकडे पहावे.

try it......best luck... :)

shashaank

4] अजून एक सोपा फॉर्म - षडाक्षरी - एका ओळीत सहा अक्षरे
उदा.
दख्खन राणीच्या
बसून कुशीत
शेकडो पिल्लेही
चालली खुशीत

माझी एक रचना -
.....................पहाटे थंडीच्या
..................... हिरव्या रानात
.................... ऐने चमकती
.................... कशिदा कामात

पहाटे रानात
वारा काकडला
स्वस्थ पहुडला
झाडा झुडपात

................  पहाटे नदीच्या
................. अंगावर कोणी
................. मऊ पांघरली
................. धुक्याची ओढणी

पहाटे राऊळी
आर्जवी भूपाळी
सोडा शय्या देवा
उठा वनमाळी

................... पहाटे दारात
................... सड्याचे शिंपण
................... रांगोळीने सजे
..................  अंगण अंगण

किलबिल कानी
जाग आली रानी
घुमे जात्यावर
मंजुळशी गाणी

..................पूर्व क्षितीजाशी
................. रेखिले गं कोणी
..................शुक्राचे गोंदण
.................. शशिच्या वदनी

रक्तिमा पूर्वेचा
शोभतो गालात
हासली गोडशी
गुलाबी पहाट

.................. धुक्यात सांडले
.................  ऊन्हाचे आरसे
................. पहाटही वेडी
................. लावी बाई पिसे .......


मिलिंद कुंभारे

अरे संसार संसार
जसा तवा चुल्यावर
आधी हाताला चटके
तेव्हा मिळते भाकर

अरेच्च्या,
शशांक, ह्यात तिसऱ्या ओळीत तर यमक जुळत नाही .... तरी वाचायला छान वाटते .... म्हणजे प्रत्येकच ओळीत यमक जुळलेच पाहिजे असे नव्हे ना .... पण कवितेला लय मात्र यायला हवी ... confused... :-\

sweetsunita66

 :) :) thanks!! पण ह्या पेक्षा जास्त शब्द असलेत तर त्याला काय म्हणावे ?...सुनिता

मिलिंद कुंभारे

शशांक,
पुन्हा दुविधेत पडलोय ....
तुझ्या ह्या कवितेतही प्रत्येक ओळीत यमक जुळत नाही ...
म्हणजे आता नक्की लयीला महत्व द्यावे कि यमक जुळवावे कळत नाहीये ???? :-\

sweetsunita66

मिलिंद माझ्या ब्लॉग वरच्या कविता कश्या वाटल्या ?...सुनिता  :(

shashaank

mee aadheech he spashT kele aahe kee layeelaa mahatv aahe, arthaatach yamakaalaa naaheeye - tareehee vegvegaLyaa ashaa kavitaa vaachoon bagh mhanaje kaLel.
aaj purate bye, bye.

मिलिंद कुंभारे

Thanks & Bye Bye.....

पुन्हा भेटू ......
पण मी तुला पूर्ण कविता शिकल्या शिवाय सोडणार नाही !!!

shashaank

#28
अष्टाक्षरीत लयीला जास्त महत्व आहे पण यमकही चुकलेले चालत नाही. दुसर्‍या व चौथ्या चरणाचे यमक जमले तरीही चालते.

तशीही तू माझीच परीक्षा बघतोएस मित्रा .....


इथे "इतर कविता" या मथळ्याखाली माझ्या काही अष्टाक्षरी मी वर काढल्या आहेत -त्याही कृपया बघणे - अभ्यास म्हण हवे तर - पण अशा बर्‍याच रचना पाहिल्या की तुझ्या लक्षात येईलच..

मिलिंद कुंभारे

#29
भुजंगप्रयात


भुजंगप्रयात हे अक्षरगणवृत्त आहे. यात लघुगुरूक्रमानुसार शब्द येतात. याचे ४ खंड असून, प्रत्येक खंड हा ५ मात्रांचा असतो. एकूण अक्षरे १२ , एकूण मात्रा-२०, यती ६ व्या अक्षराअंती. यती म्हणजे थांबणे.(pause)

हे वृत्त मराठीत मोठ्या प्रमाणात वापरले गेले आहे. समर्थ रामदासस्वामींचे मनाचे श्लोक याच वृतात आहे

भुजंगप्रयातचा लघुगुरू क्रम असा आहे -
ल गा गा    ल गा गा    ल गा गा    ल गा गा
१  २  २    १  २  २    १  २  २    १  २  २
ल म्हणजे लघु अक्षर आणि गा म्हणजे गुरू अक्षर. लघु अक्षराची १ मात्रा आणि गुरू अक्षराच्या २ मात्रा

उदाहरणे...

कशी को । ण जाणे । अकस्मा । त लाट

    कशी कोण जाणे अकस्मात लाट
    दुभंगून जाई तुलाही मलाही
    कधी भेट होई? अता राहवेना
    प्रवासी जराही, तुलाही मलाही
             ----- प्रवासी महाशय


  पहाटे पहाटे मला जाग आली
  तुझी रेशमाची मिठी सैल झाली
                    -----सुरेश भट


रसिक नव कविनो प्रयत्न करून बघा

.