कविता कशी लिहावी!

Started by मिलिंद कुंभारे, March 23, 2013, 10:14:14 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे


शशांक,
हि अष्टक्षरी जमलीय का सांग बघू ...

राधेचं प्रेम यथार्थ
मीरेचं प्रेम निस्वार्थ...
राधा कृष्णाची सावली
मीरा कृष्णाची बावरी .... :(

santoshi.world

mast kavita ha .... thanks for sharing ....


माझे एक मित्र श्री उल्हास भिडे यांची एक रचना मला इथे शेअर करावीशी वाटते -

जन्म कवितेचा
UlhasBhide | 16 July, 2010 - 19:32
जन्म कवितेचा

ये नच कविता कधि आमंत्रुन
येते कधि ना करुणा भाकुन
अनुभव, घटना मनास स्पर्शुन
जाती दुखवुन, कधी सुखावुन
विचार काहुर मनात दाटुन
जलदापरि ये मन ओथंबुन
शब्द, भावना संगम होउन
आशय बरसे काव्यघनातुन ......... १

ये नच कविता कधिही कळवुन
दार कुणाचे ना ठोठावुन
मनी जन्मुनी, येई आतुन
कवच मनाचे अवचित भेदुन
भाव मनीचे मनास लंघुन
निर्झरापरी झुळझुळ वाहुन
झर झर झरती ते झरणीतुन
आणि उतरती कविता होउन ...... २

ये नच कविता कधि हातातुन
सृजन तिचे हो मनगाभ्यातुन
विचार दर्या उधाण येउन
भाव उर्मी त्या उठती उसळुन
येति तटी अन् जाती विखरुन
शब्दांची ती रत्ने सांडुन
त्या शब्दांच्या पल्याड जाउन
भाव बोलती कविता होउन ........ ३

......... उल्हास भिडे १६-७-२०१०


shashaank

अजून नाही राधा जागी,
अजून नाही जागे गोकुळ;
अशा अवेळी पैलतीरावर,
आज घुमे का पावा मंजुळ...

मावळतीवर चंद्र केशरी,
पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामधे ऊभी ती,
तिथेच टाकून अपुले तनमन...

विश्वच अवघे ओठां लावून,
कुब्जा प्याली तो मुरलीरव;
डोळ्यांमधूनी थेंब सुखाचे,
हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव...

- इंदिरा संत
ही कविता समजून घ्यायची असेल तर कुब्जेची थोडी तरी माहिती हवी. कुब्जा ही कंसाच्या (मथुरानरेश कंस - कृष्णाचा मामा) राजवाड्यातील एक अतिशय कुरुप दासी. पण ही खूप मोठी कृष्णभक्त. तिलाही कृष्ण दर्शनाची प्रचंड आस आहे. पण कुरुपतेमुळे सगळ्या समाजातून तिची अवहेलना होत असते - सहाजिकच कृष्णाचं दर्शन कसं घ्यायचं या विवंचनेत ती असते -कारण चारचौघांसमवेत ते दर्शन शक्यच नाहीये. म्हणून अगदी पहाटेच ती एकटीच यमुनातीरी जाऊन व्याकुळतेने त्याला हाका मारतीये -त्याही अगदी मूकपणे -आतल्याआतच.. आणि कृष्ण तर सगळ्यांचे अंतर जाणणारा -त्याला ती हाक ऐकू जाणार नाही हे कसे संभवेल (खरी प्रार्थना ही ह्रदयातूनच होत असते -आरडाओरडा करुन नाही )
या कुब्जेकरता (जगाने धुडकारलेल्या एका यःकश्चित दासीकरता) तो जगनियंता बासरीतून सूर काढून तिला आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देत आहे -आणि हे कुब्जेच्याही लक्षात आलंय - की केवळ माझ्यासाठी तो मुरारी हे बासरीवादन करीत आहे - हे सगळं सगळं या कवितेत इतक्या बहारीने मांडलंय की माझी तर कधी तृप्तीच होत नाही ही कविता वाचताना -पुन्हा पुन्हा वाचत रहातो आणि थक्क होऊन जातो - की कसं हे देव्-भक्ताचे विलक्षण नाते आणि ते लीलया चितारणार्‍या ग्रेट इंदिराबाई ......
.... याला म्हणतात अस्सल काव्य - साध्या सोप्या पण मोजक्या शब्दातून ती परिस्थिती, त्या भावना व्यक्त करणे - मग त्यात ते छंद, मात्रा, वृत्त असो-नसो (अर्थात यात इंदिराबाईंनी मात्रा मोजून वापरल्यात ती गोष्ट वेगळी - कारण त्या सिद्धहस्त कवयित्री आहेत...)

shashaank

#43
प्रेम राधेचे यथार्थ
प्रेम मीरेचे नि:स्वार्थ
राधा कृष्णाची सावली
मीरा कृष्णाला भाळली  - हे लयीत बसतंय - म्हणून (गुणगुणून) बघ स्वतःशी -
"अरे संसार संसार" ही चाल आधी डोक्यात फिट्ट ठेव म्हणजे झालं.
"संसार संसार अरे" किंवा "संसार अरे संसार" हे लयीत म्हणताच येणार नाही अज्जिबात. 


santoshi.world

agree with milind .... mazya pan dokyavarun jatat ashya kavita .... kadhi kadhi tar 2-3 vela vachun pan samajat nahit ... kadhi kadhi tar yamak julavnyasathi kavine navinach sabdancha shodh lavalay ki kai ase pan vatate ....


शशांक,
प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर हे अलंकार, छन्द, मात्रा, वृत्त ह्यामध्ये अडकलेल्या कविता मला कमीच समजायला येतात, त्यातला भावार्थ/अर्थ कळायला मला ती कविता किमान २-३ दा तरी वाचावी लागते .... तरीही त्यात काही ओळींचा अर्थ उमगतच नाही .... आणि त्यात कधी कधी कवितेला लय यावी किंवा यमक जुळावे ह्याकरिता काही शब्दांचा कणाच  मोडलेला दिसतो ... पण जसे तुम्ही अष्टाक्षरी ह्यासारखे फार्म सांगितले त्यात सोप्याच शब्दांत सर्वसामान्याना समजेल, उमजेल अशा कविता नक्कीच लिहू शकतो .... बाकी ते वृत्त, मात्रा सांभाळून कविता करणे थोडे कठीणच वाटते ....

आंधीतील तेरे बिना जिंदगीसे कोई सिकवा ...... हे गाणे लयबद्ध आहे काय ??? माझे ते फारच आवडते आहे ....
कधी tv वर तो चित्रपट आला तर मी पाहायचा सोडत नाही फक्त त्या गाण्यासाठीच ....
बाकी आपल्याशी ह्याविषयावर चर्चा करण्यात मजा आली ....  :) :) :)


santoshi.world

thanks shashank for your all the post :) ... mazya sarkhya nav kavi cum vachakana hi info kharach khupach useful ahe ..... chhand matra vrutta yat kelelya kavita samjane hi suddha ek kala ahe ............... tuzya posts mule ti atmasat karta yeil :)

MK ADMIN

Wow..Shashaank Sir..amazing..

ha topic sticky kela ahe.....jene karun ya section madhye ha topic nehmi vartil rahil...navin members na yacha nakki labh hoeil.


मिलिंद कुंभारे

 क्या बात ....
पटलंय .... आम्ही पण शिकू असाच आपल्या मार्गदर्शनाखाली ....
काही नाही तर निदान अष्टाक्षरी मध्ये चारोळीच लिहू ....
thanks, शशांक .... :)

santoshi.world

@ shashank : अष्टाक्षरी मध्ये जोडाक्षर ला एक अक्षर मानावे कि दोन ?

shashaank

अष्टाक्षरी मध्ये जोडाक्षर ला एक अक्षर मानावे कि दोन ? >>>>

जोडाक्षर असले तरी ते एकच मानतात -इथे मात्रा मोजत नाहीत केवळ अक्षरे मोजतात.
"जसा तवा चुल्यावर" - २-२-४ = ८ आठच अक्षरे धरायची.