कविता कशी लिहावी!

Started by मिलिंद कुंभारे, March 23, 2013, 10:14:14 AM

Previous topic - Next topic

shashaank

काय योगायोग आहे कळत नाही -आज १३ जुलै - इंदिराबाईंची पुण्यतिथी. वर उद्धृत केलेली त्यांची कविता आजच मला इथे का द्याविशी वाटली कोण जाणे....

इंदिराबाई संत म्हणजे सरस्वती कन्यकाच - त्यांना सप्रेम,  सादर श्रद्धांजली ......

sweetsunita66

 आमच्या कडून सुद्धा मनपूर्वक श्रद्धांजली आणि आदरांजली .... सुनिता

मिलिंद कुंभारे

मालिनी (वृत्त)

मालिनी हे अत्यंत गोड वृत्त आहे. पहिल्या सहा लघु अक्षरांची मजा लुटायची असेल तर यासारखे दुसरे वृत्त नाही.

लगक्रम - ल ल ल ! ल ल ल !गा गा गा! ल गा गा ! ल गा गा
गण -     न          न          म         य            य

हे अक्षरगणवृत्त असून, प्रत्येक चरणात १५ अक्षरे असतात. यती - ८व्या अक्षरावर.

   उदाहरण
   कणभर उरलेले रूप माझे उरी घे
   मधुतर जळवंती हात माझे करी घे
   तनुभर जमलेली रात्र घे ना मिठीला
   क्षणभर जवळी ये झाकुनी दे दिठीला
                   ----ग्रेस

चला तर मित्रानो मालिनी वृत्तात कविता लिहायचा प्रयत्न करा ....

मिलिंद कुंभारे

#53
देवप्रिया

देवप्रिया हे मराठी भाषेत फार मोठ्या प्रमाणात वापरले गेलेले वृत्त आहे. हे नावही श्री. माधव ज्युलियन यांनी दिलेले आहे. या अक्षरगणवृत्ताचे मात्रांच्या हिशोबात ७-७-७-५ असे उपभाग आहेत, आणि 'विबुधप्रिया' या शंकराचार्य, मोरोपन्त आदि कवींनी हाताळलेल्या छन्दातही सप्तमात्रिक उपभाग असल्यामुळे त्या छन्दाला ज़वळचे असे 'देवप्रिया' हे नांव या छन्दाला माधवराव पटवर्धन यांनी दिले. जगन्नाथ प्रसाद 'भानु' यांच्या छन्द: प्रभाकर या हिन्दी ग्रंथांत या वृत्ताचा उल्लेख 'सीता' या नांवाने केला आहे.

मूळ उर्दू बहरचे नाव - रमल मुतदारिकुल आखिर सालिम मुरक्कब मुसम्मन' असे असून बहर-ए-रमल चे हे उपवृत्त समजले जाते.

याचे वजन पुढीलप्रमाणे-

गा ल गा गा ! गा  ल गा गा ! गा ल गा गा  ! गा ल गा
२  १  २  २     २  १  २   २    २  १  २  २     २  १  २

रमलच्या शेवटच्या खंडात गा-ल-गा-गा वजनाऐवजी गा-ल-गा हे वजन घेतल्यास देवप्रिया होते.

खंड- ४, मात्रा २६ ( ७/७/७/५)

मराठी भाषेत या वृत्तात चपखल बसणाऱ्या शब्दांचा फार मोठा खजिना आहे. प्रत्येक वृत्त प्रत्येक भाषेत चालतेच असे नाही.

उदाहरणार्थ, उर्दूतील हलन्त लघु असणारी वृत्ते मराठीत वापरता येत नाहीत. कारण आपल्याकडे ती पद्धत नाही. आपण शेवटचे अक्षर हे गुरूच मानतो. आटापिटा करून वापरल्यास ती शोभत नाहीत.


देवप्रियाची काही उदाहरणे

१)
   कालच्या स्वप्नात माझ्या, येउनी गेलास तू
   वेदना माझ्या उशाला, ठेवुनी गेलास तू..
                     --- सुभाषचंद्र आपटे

२)
   दाटलेल्या हुंदक्याला दाबणे नाही बरे
   आसवांना पापण्यांनी रोखणे नाही बरे...
                   --- सुभाषचंद्र आपटे

३)
   सांजवेळी सोबतीला सावली देऊन जा
   भैरवी गाईन मी तू, मारवा गाऊन जा...
                    --- इलाही जमादार

काही इतर लोकप्रिय गीते

१) शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी

२) त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का

३) चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले

मिलिंद कुंभारे

गण काय असते

य-यमाचा, न-नमन । त-ताराप, र-राधिका । म-मानावा, स-समरा । ज-जनास, भ-भास्कर ॥

पद्यात प्रत्येक अक्षर हे लघु (०) किंवा गुरू (१) असते. तीन अक्षरांचा एक गण होतो. पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे गणांचे २ ** ३ = ८ प्रकार आहेत.

न स ज य भ र त म

००० नमन
००१ सरला
०१० जनास
०११ यमाचा
१०० भास्कर
१०१ राधिका
११० ताराप
१११ मारावा

अर्थात मात्रावृत्तांत मात्रा मोजताना लघुसाठी १ आणि गुरूसाठी २ मोजल्या जातात. गण हे अक्षरवृत्तांत वापरले जातात.
उदा०
रामदासांनी भरपूर वापरलेले भुजंगप्रयात वृत्त -

'य'या चार येती भुजंगप्रयाती.
यमाचा यमाचा यमाचा यमाचा
० १ १.  ० १ १.  ० १ १. ० १ १.
सदा सर्वदा भक्तिपंथेचि जावे.
० १  १.० १  १.० १ १.०   १ १.

मिलिंद कुंभारे

#55
शशांक,
हे मात्रा, वृत्त, अष्टाक्षरी, षडाक्षरी मला काहीही माहित नसताना मी सहजच एक कविता? लिहिलेली होती .... पण आता जेव्हा मला ह्या मात्रा, वृत्त, अष्टाक्षरी, षडाक्षरी गीष्टींची जाण झाली तेव्हा ती कविता मला जवळ जवळ षडाक्षरी मध्ये लिहिलेली जाणवली ... म्हणून मी ती पुन्हा षडाक्षरी मध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला .... अर्थातच त्यात फारच त्रुट्या असतील ...
आता एक अभ्यासक म्हणून तुम्ही ह्या कवितेत काय त्रुट्या आहेत ते दर्शविलत आणि हि कविता आणखी कश्याप्रकारे छान लयबद्ध करता येईल हे सुचवावे अशी विनंती आहे ... 

तुझे नसणे ... स्वप्न अधुरे ...... (आधीची कविता)

तुझे नसणे
जगण्यास माझ्या
ग्रहण जसे
स्वप्नवत सारे
स्वप्नातच तुझे भेटणे
अंश मी तुझे
कि माझ्यातच
अंश तुझे
चाहूल तुझी
कि भास मनाचे ......

दिस सरले
ऋतू बदलले
नभ एक चिमुकले
ओंजळीत माझ्या
नकळत  अवतरले
त्याचे बिलगणे
त्याचे खिदळणे
बा~ बा ~ असे
बोबडेच बोलणे
सारेच कसे लुभावणे ......

मज कळेना
तुझे नसणे
खंत असे
कि तुझे असणे
सत्य दुजे
दु:ख अंतरीचे
कि सुख परतीचे
आभास म्हणावे
कि मज आशिष तुझे
क्षण फसवे
खेळ नियतीचे
कि गतजन्मीचे
तुझे, स्वप्न अधुरे ...... :)



स्वप्न अधुरे ....     .....(षडाक्षरीतली कविता)
तुझे लुप्त होणे
जगण्यास माझ्या
ग्रहनच जसे
स्वप्नवत सारे
स्वप्नात भेटणे
अंशच मी तुझे
कि जणू माझ्यात
असे अंश तुझे
ती चाहूल तुझी
कि भास मनाचे ....

ऋतू बदलले
दिस परतले
नभ चिमुकले
ओंजळी पडले
त्याचे बिलगणे
त्याचे खिदळणे
बाब्बा बाब्बा असे
बोबडे बोलणे
सारे लुभावणे ....

मजला कळेना
तुझे लुप्त होणे
मनी खंत असे
कि तुझे असणे
असे सत्य दुजे
दु:ख अंतरीचे
सुख परतीचे .....

आभास म्हणावे
कि आशिष तुझे
ते क्षण फसवे
खेळ नियतीचे
कि गतजन्मीचे
ते स्वप्न अधुरे ....  :(

शशांक,
कविता कशी लिहावी हे माहित करून घेत असताना ती कशी शिकावी हेही तितकेच महत्वाचे वाटते म्हणून हि कविता मी इथे postmortem साठी पोस्त केलेली आहे .... ह्यातूनच नव कवी जेव्हा कविता लिहितो तेव्हा तो काय चुका करतो हे निदर्शनास येईल .... मला वाटतं मी आपल्याला फारच त्रास देतोय ... पण तरीही बघा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ह्यावर जरूर comment करा ....  :(

shashaank

वा, मिलिंद, ही बेसिक माहिती इथे द्यायची फार गरज होती - ती माहिती इथे अतिशय सुंदर पद्धतीने दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. खूप सुरेख व अभ्यासपूर्ण उदाहरणे दिली आहेस हे ही फारच छान.

मिलिंद कुंभारे

कल्लोळ शब्दांचा

पुरे कल्लोळ शब्दांचा,
पुरे खेळ भावनांचा,
मज वाटतसे आता,
छन्द, वृत्त यमकांचा,
ध्यास नुसता धरावा,
एक लिहावी कविता,
अन रचता कविता,
लय मिळावी शब्दांना,
सूर जुळता काव्याला,
मजा लुटावी गातांना...

मिलिंद कुंभारे

shashaank

पुरे कल्लोळ शब्दांचा,
पुरे खेळ भावनांचा,
मज वाटतसे आता,
छन्द, वृत्त यमकांचा,


अष्टाक्षरीत चार चरणांचे/ओळींचे एक कडवे असते - एवढा एक नियम पाळला की ही तुझी अष्टाक्षरी परिपूर्ण होईल - चांगली जमली आहे ही  अष्टाक्षरी.

shashaank

कळले ताई ?
- रसप | 16 July, 2013 - 13:32

शाळेसाठी
जातानाचा
डोंगरातला
रस्ता होता
आठवतो का
आता ताई ?


घोट्याइतके
खळखळ पाणी
असलेला तो
ओढा लागे,
त्याच्यानंतर
माळावरच्या
चिखलामधली
पायवाटही
थबथब थबथब..!!
आठवते का ?

रोज तिथूनच
दूर-दूरच्या
शाळेसाठी
चालत जाणे
तरी कधीही
कंटाळाही
आला नाही
आठवते का ?

बरेच चालुन
गेल्यावरती
शाळा येई
तू आनंदी
अन् मी दु:खी
रोज व्हायचो
आठवते का ?

कितीकितीदा
माझ्या बाई
माझ्याबाबत
तक्रारींचा
तुझ्याचपाशी
पाढा वाचत
पण तू कधिही
आईला ना
सांगितले ते
आठवते का ?

मला आठवे
तेच नेहमी
म्हणून अजुनी
आयुष्याच्या
ह्या रस्त्यावर
माझ्यासोबत
तू नसल्याच्या
तक्रारींना
कुणाकडेही
कधीच मीही
मांडत नाही
कळले ताई ?


....रसप....
१६ जुलै २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/07/blog-post_16.html

रणजित पराडकरची ही एक यमकविरहित पण वृत्तात बांधलेली रचना - या रचनेला एक छान लय आहे - वाचता वाचता आपल्याला ती लय सहजच सापडते.
चित्रदर्शी - हुबेहुब वर्णन करणारी - अशी ही कविता शेवटाला अगदी उंचीवर नेऊन ठेवलीये रणजितने ...


अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कविता वाचल्याने कवितेचे वेगवेगळे फॉर्म्स आपल्या लक्षात येतात.