माझा मी एकटा

Started by tejam.sunil@yahoo.com, March 24, 2013, 11:39:35 PM

Previous topic - Next topic

tejam.sunil@yahoo.com

कुणीच आपल नसतं
मग आपण कुणासाठी असतो
आपलं हे क्षणिक समाधान
इथ प्रत्येक जण एकटा असतो

शब्दांनाहि कोड पडावं
अशीही काही माणस असतात
किती आपलं भाग्य असत
जेव्हा ती आपली असतात

अस्तित्वाची किंमत
दूर गेल्याशिवाय कळत नाही,
सगळ कळतय मला
पण सोडून दुरही जावत नाही

जिवनात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्यात महत्व असत
कारण मागितलेला स्वार्थ
अन दिलेलं प्रेम असतं

कधी कधी जवळ
कुणीच नसावसं वाटतं
आपलं आपण
अगदी एकट असावसं वाटत....

म्हणूनच वेडा आहे मी थोडा
एकता आणि एकांत असतो
असंख्य वेदना आणि जीवनाचा भार
अस मी जीवन जगत असतो

@ सुनिल

Tushar Kher

कधी कधी जवळ
कुणीच नसावसं वाटतं
आपलं आपण
अगदी एकट असावसं वाटत....

chhan

Tushar Kher

kabhi kabhi tanha rahene ko man karta hai
na hi kisi se kuchh kahene ka man karta hai