गुज

Started by shraddha.shinde.3990, April 04, 2013, 04:06:35 PM

Previous topic - Next topic

shraddha.shinde.3990

कधी कळेना कुठे मन माझे वेडावले
जाताना तू फिरुनी मग मी पाहिले
ठाऊक होते मजला कि
तू जात आहेस दूर निघोनी
पण पुन्हा पुन्हा का मग माझे
पाउल तुज्याकडे वळले ..............

बेधुंद भावनांना मग वात द्यावी
मोकळी करुनी ............
असे हे वेडे मन मग पुन्हा
खुणावत राहिले .....................

मनी ध्यानी नसताना हे सारे
सहजच घडोनी गेले...............
त्या ओल्या भावनांनी देखील मग
वादळ मनात उठले .............

कसे सांगू प्रिया तुझ गुज
माझ्या मनीचे
का उमजत नाही तुजला
भाव माझ्या अंतरीचे ...........


उभा असतोस एकटाच मग तू
देखील त्या किनाऱ्यावरी
ज्यावरती मी प्रथम तुजला भेटले
ज्यावरती मी प्रथम तुजला भेटले ...............................

मिलिंद कुंभारे

छान प्रयत्न आहे!