मी कविता का करावी ?

Started by vaibhav joshi, April 17, 2013, 11:36:57 PM

Previous topic - Next topic

vaibhav joshi

मी  कविता का करावी ?
बुद्धीला सुचते म्हणून की मनाला बोचते म्हणून ...
कुणी मला जपतो म्हणून की मी कुणाला खुपतो म्हणून
मी  कविता का करावी ?
सवय आहे म्हणून की काही हवंय म्हणून
जाणीवेच भान जपायचं म्हणून की नेणिवेच पान खुडायचे म्हणून
मी  कविता का करावी ?
केवळ तिचा बाप होण्यासाठी की तिचा गायनसुलभ छाप होण्यासाठी
शक्ती , मुक्ती  भक्ती साठी की युक्ती व्यक्ती अभिव्यक्तीसाठी
मी  कविता का करावी ?
मी  कविता  करावी का?
मी  कविता करावी ... ?

--- वैभव वसंत जोशी , पुणे

केदार मेहेंदळे

#1
कविता करावी व्यक्त होण्या साठी
कविता करावी मुक्त होण्या साठी
कविता करावी स्वतः साठी
कविता करावी समाजा  साठी
कविता करावी जगण्या साठी
कविता करावी जगवण्या साठी

केदार.... 

अशोक भांगे (सापनाई कर )

शब्दांचा आहार ,
विचारांचा प्रहार ,
प्रेमाचा अविष्कार ,
रागाचा ओघ ,
स्वप्नांचा मोह ,
कविता  आहे एक प्रवाह भावनांचा  ...

मिलिंद कुंभारे

छान आहे कविता......

कविता  आहे एक प्रवाह भावनांचा  ...

छान आहे :) :) :)