** माझा मृत्यू **

Started by SANJAY M NIKUMBH, April 19, 2013, 08:21:23 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

** माझा मृत्यू **
----------------------------
माझा मृत्यू
जो नैसर्गिकपणेच येईल
असं वाटत होत कालपर्यंत
पण आज ठाम मत झालंय
तो कधीही येईल
अगदी पुढच्या क्षणापर्यंत .............
नाही सोसवत मला
तुझ्या दुराव्याचे दाहक क्षण
मी भेटायला आल्यावर
तुझं ते अवघडलेपण
पुन्हा पुन्हा विचारावस वाटत
कां इतका जीव लावलास तू मला
कां तुझं इतकं वेड
लावून टाकलस या जीवाला
हरवलाय प्रत्येक क्षण
फक्त तुझ्याच विचारात
तुझ्याशिवाय काहीच अर्थ
वाटत नाही जगण्यात
तू नाहीस माझ्या जीवनात
या कल्पनेन जीव गुदमरतो
प्रत्येक क्षणी डोळ्यासमोर
उभा मृत्यू पाहतो
वाटत कुठल्याही क्षणी
हा श्वास थांबून जाईल
मृत्यू त्याच्या मिठीत
मला घेऊन जाईल
मलाही हवाय असाच मृत्यू
जो प्रेमान भारलेला असेल
वाट बघेन मी पुढच्या जन्मी
तेव्हा तू फक्त माझीच असेल .

कवी : संजय एम निकुंभ , वसई
दि. १५ . ४ . १३ वेळ : १० . १५ स.

rudra


मिलिंद कुंभारे

वाटत कुठल्याही क्षणी
हा श्वास थांबून जाईल
मृत्यू त्याच्या मिठीत
मला घेऊन जाईल
मलाही हवाय असाच मृत्यू
जो प्रेमान भारलेला असेल
वाट बघेन मी पुढच्या जन्मी
तेव्हा तू फक्त माझीच असेल :( :( :(

छान कविता आहे! आवडली!! :) :) :)


अशोक भांगे (सापनाई कर )


mayurkumarsky