पंच महाभूते

Started by shashaank, May 04, 2013, 04:17:39 PM

Previous topic - Next topic

shashaank

पंच महाभूते

धरा झेली सार्‍या भूता
ठेव अवघी सांभाळी
भार वाहते एकली
उभ्या जगाची माऊली

ठेव थेंब ओलाव्याची
अनमोल सार्‍या जीवा
फुले जीवनाचा मळा
जीव भेटतसे जीवा

ठेव दीप्तीमंत अति
रवी हृदय अंबरी
उब अंतरात जरी
जीव चळवळ करी

ठेव झुळुझुळु वाहे
वारे आसमंती जात
बांधताती हळुवार
पृथ्वी-आप जन्मगाठ

महाभूत ते थोरले
पैस दिसेना कळेना
राही व्यापून चारींना
काय दाखवाव्या खुणा

विरोधात ठाकताती
एकाचढ एक जाणा
तरी असे कालवले
यांचा निवाड लागेना

कळे एवढे बुद्धिला
परी "जीवन" कळेना
वादविवाद करता
अंत पार तो लागेना..


-shashaank purandare.

विक्रांत

सुंदर ,पैस शब्दाचा वापर  आवडला .

shashaank