अर्ध्यावर सोडून मला…

Started by टिंग्याची आई..., May 06, 2013, 01:35:01 PM

Previous topic - Next topic

टिंग्याची आई...

सखे अर्ध्यावर सोडून मला... त्या भिंतीवरच्या फोटोत जाऊन बसलीस....
आजवर सांभाळलंस... अन अचानक निराधार करून गेलीस...
आता पापणीही न लवता.... अखंड आपल्या घराकडे पाहत असतेस...
आजही इथल्या कणा कणात... फक्त तूच जाणवतेस...

त्या फोटोतल्या खांद्यावर डोकं ठेऊन... मला आता रडता येत नाही....
धावत येउन तुला... घट्ट मिठी मारताही येत नाही...
पण मी समोर आल्यावर... तुझा हसरा चेहरा अनुभवता येतो...
तू पाहत असशील नक्कीच... म्हणून मीही माझी आसव लपवतो...

तुझ्या त्या निरागस चेहऱ्याला आता... कुरवाळता येत नाही...
तुझ्या कुशीत शिरून दोन क्षण...  मला विसावताही येत नाही...
किती खोल पाहिलं तरी... त्या डोळ्यांत फक्त मीच दिसतोय...
हरवलेलं माझं मन... तुझ्या पर्यंत पोचेल का ते पाहतोय...

तुझ्या काळ्याभोर केसांत हात फिरवत... आता रात्र घालवता येत नाही...
स्वप्नात येउन भेटतेस रोजच... म्हणून मी जागा सुद्धा राहत नाही...
पहाटेची तुझी गोड हाकच... मला आजही जाग आणते...
पूर्वी तासनतास न जाणारी झोप... हल्ली क्षणात नाहीशी होते....

डोळ्यात साठलेलं सगळं पाणी... हल्ली बाप्पासमोरच कोसळतं...
न चुकता रोज माझी... त्याच्या देवळापर्यंत सोबत करतं...
तुझा फोटो आणि बाप्पा... आता दोघांसमोर हात आपोआप जुळतात...
जबाबदारीच्या सगळ्या गोष्टी... तुझ्या या वेड्याला अगदी व्यवस्थित कळतात....

जमलच तर परत ये... बघ मी कसं सावरलंय आपलं घर...
तुझ्याविना अर्धवट या आयुष्याला... फक्त एकदाच येउन पूर्ण कर...
मागणार नाही कधीच काही... तुझ्या लाडक्या बाप्पाकडे...
सांगून बघ... घेतोय का...? मला कायमचं बोलवून तुझ्याकडे...

- Shailja
http://tingyaachiaai.blogspot.com/2013/05/blog-post.html

केदार मेहेंदळे

ridhay sprshi kavita... atyant utkat bhav vachtana man akrandat.... far chan....far chan

टिंग्याची आई...

:)
Thanks for the comment Kedar.... Chaan vatla vachun...
eka photo varun suchli hoti hi poem.. :)

मिलिंद कुंभारे



D KANOLKAR

Thanks mazha kade shabdha nahit hya kavitechi shthuhi karayala. Mazya manatle sagle shabdh tumhi  vinlele ahet. Kharach i m speechless. Majha ayushatli satyata ahe hi. With your permission please allow me to post this on my facebook book. Please Please Please!!!!!!, Thanks & awaiting your reply.

टिंग्याची आई...

Tumchya ayushyatli satya ahe he aikun kharatar vait vatla... :(
yes.. you can post this poem on your all... I will be honored....
Take care.... :)

D KANOLKAR


sandeep kakde


sweetsunita66

 हृदय स्पर्शी   कविता