मला माफ करणार नाहीस..

Started by Ankush S. Navghare, Palghar, May 12, 2013, 11:37:47 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

इतकी रागावलीस
की बोलणार हि नाहीस
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस..
तुला माहित आहे ना
तुला किती miss करतो
सर्वात जास्त तर
तुझ्यावरच प्रेम करतो
तुटलेले मन परत जोडणार नाहीस
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस..
एक क्षणही तुझ्याशिवाय
आता वेळ जात नाही
तु नसलीस की मन
कशातही रमत नाही
एकदातरी हास ना
की कधीच हसणार नाहीस
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस..
तुझ्याशी नाही बोललो
तर अन्न गोड लागत नाही
हरवलेल्या नझरेला
दुसर काही दिसत नाही
ए सांग ना ग आता
की काहीच सांगणार नाहीस
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस..
कोणी प्रेम नाही दिले
सर्वांनीच झिडकारले
ह्या दुर्दैवी जीवाला
फक्त तूच प्रेम दिलेस
कसे फेडू उपकार तुझे
सात जन्मांत जमणार नाही
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस..
प्रेमाची किंमत
मलाच कळू शकते
माणसांची किंमत
तुलाच मात्र कळते
तु नाही विचारले तर
मला कोणी विचारणार नाही
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस..
माझ्या हृदयात तर
फक्त तू आणि तूच आहेस
पण तुझ्या हृदयात मला
छोटीशीही जागा देणार नाहीस
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस..

...प्राजुन्कुश
...Prajunkush.

www.facebook.com/ankush.navghare.353

Maddy_487

हि कविता वाचून दाखव लगेच करेल तुला ती माफ ...


kuldeep p

wah! kya baat hai
Jabardast Come back  :)
be positive yaar  :(


विक्रांत

flow सतत राहिला मध्येच तुटला नाही व क्षीण झाला नाही ,छान .

Ankush S. Navghare, Palghar


Sagar raut

एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस..

mastt

Ankush S. Navghare, Palghar


arpita deshpande


कोणी प्रेम नाही दिले
सर्वांनीच झिडकारले
ह्या दुर्दैवी जीवाला
फक्त तूच प्रेम दिलेस
कसे फेडू उपकार तुझे
सात जन्मांत जमणार नाही.......EXCELLENT