स्वधन

Started by sweetsunita66, May 16, 2013, 04:05:58 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

ऐका  हो ऐका समदे जन ऐका .
माह्या दादल्यानेकेल्या दोनदोन बायका .
एक  म्हणे राधा तर दुसरी म्हणे रुक्मिणी ,
गुण्या  गोविंदान म्हणे राहा दोघिबी जनी .
म्या त्यानले म्हणल तिसरिले बी आना,
नायतर घुश्यात इल न ती सत्यभामा .
माणसाचं बर बा एक नाही तीन -तीन ,
सीते वाणी बाईला मात्र वनवासात धाडतीन.
म्या त्यानले खडसावल ,वटारून डोये दावल ,
म्हणल डोक्या वरले केस ठेवायचे आहेत काय राखून ,
नायतर म्या एकलीच उरून  पुरते इंगा दाखून .
२० व शतक संपलं२१ व लागलं.,अन बायकांना म्हणे चंडिका रूप भलं पावलं.
माणसाना माणूस समजा नका समजू देव
बाईतला बाई पण अन स्वाभिमान राखून ठेव .
जन्म द्यायचे आहेत तुला अनेक भारत रत्न ,
अन जपण्या साठी संस्कृती करायचे आहेत प्रयत्न .
माणसां पुढे दबून राहून दमकोंडी व्हायची ती किती ?
जप जेवढी जपता येईल हि उबाऊ नाती .
सावध हो बाई झोपेतून .अन स्वाभिमानाने जग .
मग पहा लवकरच तुझी प्रशंसा करेल हे जग ..............................
                                                                   सुनिता नद्गे [शेरकर]

केदार मेहेंदळे


sweetsunita66

धन्यवाद ! :)

मिलिंद कुंभारे


ऐका  हो ऐका समदे जन ऐका .
माह्या दादल्यानेकेल्या दोनदोन बायका ..........
  :D :D :D :D :D
छान ...... लय भारी हय......

sweetsunita66

ohhho......मिलिंद ।  !नावात काय आहे म्हणाले होते एक महान कवी
                   कुणालाही आवडेल असे असावे कार्य अन अशी असावी छवी ............. thats  u r .thanks

shashaank

जबरदस्त

sweetsunita66

धन्यवाद ....शशांक ....