अश्रू

Started by aap, May 19, 2013, 11:21:44 AM

Previous topic - Next topic

aap

साडेतीन हाती कुडीमध्ये
वसली दोन लोचन कमळे
या कमळांना कोंदण म्हणुनी
आसवांचे असे तळे

सुखदुखः, कारुण्याची, मायेची, आनंदाची त्यास असे किनार
म्हणुनी वाहते डोळ्यामधुनी अश्रूंची ही धार
जरी चाखता तिखट  डोळ्यात उभा अश्रू क्षणिक
परी बोलता तिखट होते हृदयी जखम
नसे बांध मग त्या अश्रू ला
अश्रू वाहतो कायम

दु:खाच्या कैक प्रसंगी पडे अश्रूंचा पाऊस
सुखाच्या त्या अत्युच्य शिखरी डोळा पाझरे अश्रूंचा उरूस
वात्सल्याचा जिथे उन्हाळा अश्रूंचा तिथे उमाळा 
आसू हसु ची ही परिभाषा कुणास नच समजली
नयनास असे उमगली   
नयनास असे उमगली   

प्रशांत नागरगोजे

MK वर स्वागत आणि कविता छान आहे ... :)

केदार मेहेंदळे

kavita chan ahe...tumhi lihili aslyas kavite khali tumche nav lihave...

sweetsunita66


rudra

kavitechi shabdhrachna farach durlab aahe tyamule kavita kharyane vachavishi vaatate.....
kedarne sangitlya pramne naav apekshit aahe....