एक ढग

Started by केदार मेहेंदळे, May 20, 2013, 03:57:35 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

एक आकाश, कोरडं पडलेलं
दूर दूर पर्यंत
ढग नसलेलं

एक नजर कोरडी पडलेली
दूर दूर पर्यंत
ढग शोधणारी

एक ढग भरून आलेला
आंत पाणी तरी
न बरसलेला

एक हुंदका दाटून आलेला
डोळ्यात पाणी तरी
गळ्यात अडकलेला

एक नजर ढगावर खिळलेली
आनंदानी भरलेली अन
हायसं वाटवणारी

एक झुळूक हळूच आलेली
गार्व्यानी भरलेली अन
हायसं वाटवणारी

एक थेंब भुइवर पडलेला
तापली मातीथंडावणारा
अंकुर रुजवणारा

एक अश्रू गाली ओघळलेला
मनातला आनंद दाखवणारा
विश्वास रुजवणारा

एक थेंब, एक अश्रू
जीवन प्रवाहित करणारा
सुखावणारा, रुजवणारा


केदार.......

shashaank

काय अप्रतिम लिहिलंस केदार - ग्रेट, ग्रेट......

विक्रांत


swatium

khupach sundar ashay ani shabd sudhha ...!

rudra

एक ढग भरून आलेला
आंत पाणी तरी
न बरसलेला

apratim....kedar bhai...

sweetsunita66

मस्त !!!! अप्रतिम ... शब्द रचना  आहे . मनापासून आवडली ।  :) :) :) :) :)

प्रशांत नागरगोजे

लई भारी लिहिलंय बुवा.....नाद खुळा :)