**मधुचंद्राची रात्र **

Started by कौस्तुभ (मी शब्दवेडा), May 21, 2013, 04:05:35 PM

Previous topic - Next topic
**मधुचंद्राची रात्र **


आपल्या मधुचंद्राची रात्र सखे,
मी स्वप्नात ग पाहिलेली...
स्वप्नातल्या त्या
झोपाळ्यावर,
तु बसली होतीस लाजलेली...

खोलीत सर्वत्र पसरला होता,
फूलांचा मधुर तो गंध...
त्या गंधाला विसरुन  सखे,
झालो तुझ्यात मी धुंद...

तुझ्या केसांची बट मागे सारुन,
तुझ्या मानेवर मी ओठ टेकवले...
माझ्या ओठांच्या स्पर्शाने सखे,
अंग तुझे शहारले...

तुझ्या ओठांचा स्पर्श  मला ,
हवाहवासा वाटत होता...
तो कोमल स्पर्श मला सखे,
स्वर्गसुखात नेत होता...

तुझा गोरा रंग सखे,
डोळे माझे दिपवत होता...
क्षणा क्षणाला माझा संयम,
अधिक अधिकच सुटत होता...

अधिक अधिकच सुटत होता...

© कौस्तुभ

मिलिंद कुंभारे

कविता फारच छान .......

पलंगावर हा शब्द शृंगारिक वाटत नाही, साधाच वाटतो.
त्याऐवजी असे लिहिले तर......

स्वप्नातल्या त्या हिंदोळ्यावर (किंवा झोपाळ्यावर)
तु बसली होतीस लाजलेली...

खोलीत सर्वत्र पसरला होता,
फूलांचा मधुर तो गंध... :) :) :)

Dhanyawad Milind sirr
Aplya suggestion pramane me zopalyavar ha shabd lihito

mazyakade jast shabd sangrah nahiye
tevha
ha shabd nahi suchala

Dhanyawad  suchavlya baddal :)

Maddy_487

वा  क्या बात है !


मिलिंदजी अगदी योग्य बदल सुचावलात.

Ankush S. Navghare, Palghar


sweetsunita66

छान कविता !!!!शायद अभी अभी शादीका लड्डू खाया हैं "अभिनंदन !!! :) :) :)

दमयंती

मधु-चंद्र, अमावास्या
प्रतिपदा, द्वितीया, तृतीया
चंद्रग्रहण, सूर्यग्रहण
राहू-केतू आदि सगळ्यांचा
आयुष्याच्या आकाशात
कुंभमेळा जमलेला आहे.



rasika K.

mazi same kavita ahe...fakt... tuza gora rang sakhe  aivaji ...
tuza sawla rang sakhe ase ahe