मन...

Started by कौस्तुभ (मी शब्दवेडा), May 24, 2013, 11:36:56 AM

Previous topic - Next topic
मन...

मना आलय उधाण,
पाहुन पोर्णीमेच चांदण...
मना व्हाव वाटे चंद्र,
जाव चांदण्यात न्हाऊन...

मन वाहतं पाण्यावर,
तरंग होउन...
मन भिडते आभाळाला,
पाखरु बनुन...

मन मोहरत कधी,
वसंत पाहुन...
मन होत ओलं चिंब,
श्रावणसरींत न्हाऊन...

मन झुलतं वार्यावरती,
हिंदोळा होऊन... 
मन होत अदृश्य कधी,
मृगजळ बनुन...

मन भरकटत कधी,
पतंगा सारखं...
मन शांत बसत कधी,
उदास होऊन...

© कौस्तुभ

rudra

kaustubh.....apratim...

sweetsunita66

मस्त !!!! अप्रतिम ...

धन्यवाद रुद्र आणिसुनीताजी :D