IPL तमाशा

Started by केदार मेहेंदळे, May 30, 2013, 09:40:15 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

I.P.L. म्हणजे cricket नाही
तो एक Reality show आहे
पैसा, मस्ती अन glamour चा
full 2 वसूल bomb आहे


गुलामांचा भरायचा बाजार
इतिहासात काळी नोंद आहे
करोडोला विकले गेले खेळाडू
I.P.L. चीच हि देन आहे

Sponsors ची काही कमी नाही
पैशांचा वहातो पूर आहे
प्रत्येक player चालता फिरता
advertize चा flex board आहे

कुणा खेळाडूचा भाव चढा
कुणाचा भाव सस्ता आहे
प्रत्येक फटका आणि Ball चा
लागला इथे सट्टा आहे

Match जरी आधीच fix तरी 
प्रत्येक over खेळायचीच आहे
Ad revenue अन T.R.P. चं
अजब हे गणित आहे

कोण मूर्ख तो ओरडला, I.P.L. म्हणजे
Gentle men game चा बट्याबोळ आहे
बिगुल, शिट्ट्या, cheer Girls च्या नादात
सगळं public बघ कसं बेभान आहे

दुष्काळ, scam, चीनी आक्रमण
सगळ्यावर I.P.L हा उतारा आहे
व्यर्थ ओरडताय तुम्ही महागाई, महागाई
काळा बाजार तिकीटांचा जोरात आहे

पकडलेत काहींना तरी फिकीर नाही
कायद्याचा मसुदा अजून कच्चा आहे
पुढल्या I.P.L.ला लाउ चढी बोली
वाहाणार दर वर्षी हि गंगा आहे


केदार...

मिलिंद कुंभारे


shashaank

जबरी लिहिलंस केदार, प्रचंड आवडलं.

Maddy_487

केदार जी
एकदम भन्नाट !