गावात माझा श्वास कोंडला

Started by केदार मेहेंदळे, May 31, 2013, 03:18:43 PM

Previous topic - Next topic

datta chinkate


  धूळ मातीचे साम्राज्य इथले
वाटते गावांस मी विसरावे
गावात माझा श्वास कोंडला
मना वाटते शहरात रहावे

एक झोपडं बाप जाद्याचं
तेच वाटते अमाप वैभव
इवले शेत हे कसे जपावे?
खुराड्यातले असले जीवन
गोठया मधल्या शेण मुताच्या
गंधा पासून दूर पाळावे
गावात माझा श्वास कोंडला
मना वाटते शहरात रहावे

खिडक्यांना ना पडदे इथे अन
दार कुठलेही कधी बंद नसे
आओ, जाओ घर तुम्हारा
बायको संग एकांत कुठे!
टी.व्ही. वरच्या मालिकाही
बघणे कधी नशिबी कुठे
गावात माझा श्वास कोंडला
मना वाटते शहरात रहावे

लुगडे घेता बायको साठी
बहिण सख्खी लगेच रुसे
नाकदुर्या मग तिच्या काढण्या
पत्नी सर्वांच्या पाया पडे
एकत्र इथल्या कुटुंबात हे
दृश्य असले नेहमीच दिसे
गावात माझा श्वास कोंडला
मना वाटते शहरात रहावे

लेक सासरी जाण्या निघता
रंक असो वा रावाची ति
देणं, घेणं, मानपाना वरुनी
व्याही, नातलग अडवून धरती
रुसवे फुगवे किती चालती
समजूत त्यांची कशी काढावी?
गावात माझा श्वास कोंडला
मना वाटते शहरात रहावे

शहरा मधल्या तरुणाईला
भुरळ घालते गावची रहाणी
नसेच रोजचे जीवन सुकर 
करमणूक हि घडी भाराची
दे मजं देवा शहरात काम तू
काय कारणे गावी उरावे
गावात माझा श्वास कोंडला
मना वाटते शहरात रहावे
   
  केदार....

आपल्या सामुहावरचे जेष्ठ कवी श्री निशिकांत देशपांडे ह्यांच्या "मला वाटते परत फिरावे" ह्या कवितेवरून लिहिलेली हि कविता आहे. श्री निशिकांत देशपांडे ह्यांच्या "मला वाटते परत फिरावे" ह्या कवितेत त्यांनी गावातून शहरात आलेल्या व्यक्तीच्या मनाची शहरात होणारी घुसमट दाखवली आहे. पण मला असं वाटतं कि गावात रहाणार्या व्यक्तीला एखाद वेळेस ह्या उलट वाटत असेल. अर्थात माझे गाव आणि गावा बद्दलचे ज्ञान हे पुस्तकात आणि सिनेमात बघितलेल्या पुरतेच मर्यादित आहे. ह्या कवितेत मी गावतल्या किंवा शहरातल्या जीवना बद्दल चांगले किंवा वाईट आस काहीच लिहित नाहीये. श्री निशिकांत देशपांडे यांनी लिहिलेल्या प्रत्येक कडव्याची गावात राहिलेल्या माणसाच्या दृष्टीनी दुसरी बाजू लिहिली आहे.

हि कविता टाकण्याच्या आधी मी श्री निशिकांत देशपांडे ह्यांच्याशी चर्चा करून त्यांची परवानगी घेतलेली आहे.

केदार....