सायंकाळ

Started by kumudini, June 04, 2013, 06:39:33 PM

Previous topic - Next topic

kumudini


सायंकाळी एके वेळी
विहरत होते मी उद्यानी
वरती होती सांज गुलाबी
हिरवी मखमल पाया खाली
धुंद मोगरा धुंद केतकी
साथ करी त्या शुभ्र सायली
मंद गंध तो अवचित आला
फुलताना ती कळी जुईची
सांज जाहली अवचित रजनी
फुलली गंधीत रजनी राणी
ती सांज तो वास तो गंध
अजूनही आहे मम हृदयातली
कुमुदिनी काळी कर


कवि - विजय सुर्यवंशी.


Maddy_487


मिलिंद कुंभारे


केदार मेहेंदळे


rudra