मी आणि माझं मन...

Started by कौस्तुभ (मी शब्दवेडा), June 06, 2013, 04:31:06 PM

Previous topic - Next topic
वाटलं एखादी अशी कविता लिहावी,
तिला कुणाची जोड नसावी...
नको तू अन् नको ती,
बाकीची खोटी
दुनियाही तित नसावी...

तिच्यात असावं,
फक्त मी आणि माझं मन...
नको तिच्यात उगीच,
बाकीचं माजलेलं तन...

मी आणि माझं मन...

तसं आम्हा दोघांच,
कधीच नाही पटायचं...
मी जमिनीवर चालायचो,
तर ते आभाळात उंच उंच उडायचं...

आजपर्यंत माझ्या मनाने खूप काही सोसलं,
नव्हे मीच त्याला ते सोसायला लावलं...
पण त्याने माझी साथ कधीच सोडली नाही,
किती भरकटलं तरीही ते माझच राहिलं...

कधीतरी मी निराश झालेला एकटाच बसायचो,
मनात भावना, श्रद्धा, आपुलकी, माया ह्यांच्या विचारांचं थैमान माजायचं...
या सर्वांत माझं मन खूपदा झुरायचं - झिजायचं,
कधी कधी तर ते माझ्यावरच रुसायचं...

माझ्यावरचं रुसलेलं माझं मन,
माझ्यापासून दूर...लांब लांब उडत जायचं...
कधी ते उंच झाडाच्या,
फांदीवरती चढून बसायचं...

ढगांचा गडगडाट होऊन पावसाची चाहूल जेव्हा लागायची,
तेव्हा ते खूप घाबरायचं, धावत पळत येऊन माझ्या आत लपून बसायचं...
पण मीही असाच वेडा..
त्याच्या विरोधातच वागायचो, त्याला ओढत ओढत नेत मी पावसात भिजायचो,
पावसात भिजून माझ्या मनावरच मळभ धुवून जायचं अन् माझं मन पुन्हा नव्याने उमलायचं...

© कौस्तुभ

santoshi.world