पाऊस

Started by aap, June 08, 2013, 03:20:25 PM

Previous topic - Next topic

aap

पाऊस

घन काजळ रेखुनी

आल्या पावसाच्या सरी

गंध मातीचा पसरे

चराचरी उधाण वारे

पावसाची रिमझिम

जसा पॆजणाचा नाद

ओसंडूनि वाहे मन्मनी आनंद

पावसाचा थेंब थेंब

फुटे भुई कोंब कोंब

धरेवरी पसरे हिरवळीचा डोंब

पावसाचे झुळु  झुळू पाणी

गातो निर्झर मंजुळ गाणी

हिरवळीचा हिरवा शालू

निर्झराचा नीळा कांठ

श्रुष्टी देवता सजली

पावसाच्या तालावारी

                      सौ . अनिता फणसळकर