आशावाद

Started by SANJAY M NIKUMBH, June 09, 2013, 07:41:18 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

आशावाद
--------------------
मी हि बघतो स्वता:ला
निराशेच्या खोल गर्तेत
डुबत जातांना
झोकून द्यावसं वाटत
अंधारलेल्या डोहात
नकोसं होतं जेव्हा जगतांना
फक्त एक भावना
उफाळून येते मनात
त्या क्षणापुरती
कुणीच नाही माझं
या भावनेचा अंमल
चढतो मनावरती
पण त्या भावनेला माझ्यावर
मी कधीच
स्वार होऊ देत नाही
आयुष्य सुंदर आहे
हा जीव पुन्हा नाही भेटणार
हे कधी विसरत नाही
काहीही गमावलं तरी
ते पुन्हा भेटू शकतं
अन नाही भेटलं तरी
जिवापेक्षा अनमोल
कुठलीच गोष्ट
असू शकत नाही
त्यासाठी हवा
मानसिक खंबीरपणा
अन जगण्याचा
दुर्दम्य आशावाद .

                                             संजय एम निकुंभ , वसई
                                         दि. ९ . ६ . १३  वेळ  : ७ . ०० संध्या .