पहिला पहिला पाऊस .....

Started by Sameer Nikam, June 10, 2013, 10:18:48 PM

Previous topic - Next topic

Sameer Nikam

 पहिला पहिला पाऊस
रिम झिम रिम झिम बरसत होता
आपल्या आठवणीच्या मोहर पल्लवित करत
डोळ्यात माझ्या अश्रू ओंझाळत होता

आजही भरदिवसा काळोख पसरला होता
विजांचा गडगडाट माझ्या मनाला
तू माझ्या मिठीत असल्याचे भासवत होता

गार गार वाऱ्या सोबत
सरी बेभान बरसत होत्या
रोम रोम हर्षुनी येताच
तू जवळ नसल्याचे
कानात पुटपुटून जात होत्या

तुझ्या केसांतून ओझळनारे थेंब 
तळ हातावर घेत होतो
त्यात तुझे प्रतिबिंब पाहून
स्वताला तुझ्यात हरवत होतो

तू येशील ह्या आशेने
आजही डोळे माझे सताड पाऊल वाटेकडे पाहत असतात
पण आजही रिम झिम रिम झिम पाऊस
त्यांना हळू हळू पुसत असतात

पहिला पहिला पाऊस
आजही रिम झिम रिम झिम बरसतो
मी मात्र आठवणीत गुंतलेला
तू दूर गेल्याचे कारण शोधत असतो.

समीर सु निकम




 

मिलिंद कुंभारे

पहिला पहिला पाऊस
आजही रिम झिम रिम झिम बरसतो
मी मात्र आठवणीत गुंतलेला
तू दूर गेल्याचे कारण शोधत असतो. .....

nice poem..... :)

Sameer Nikam


Ankush S. Navghare, Palghar

Sameer ji sundar kavita...

Ali sar dhaun tari
Premacha abhav hota
Dolyanchi saath dyayala
Dukhachach paus hota...