सत्संग

Started by विक्रांत, June 11, 2013, 11:03:13 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

 

शब्द शब्द मी ऐकत होतो
तरीही किती कोरडा होतो
मारून मुटकून भाव भक्ती
उगाच गोळा करत होतो ll १ ll
अनुभूतीच्या प्रवाहात ते
चिंब चिंब भिजत होते
माझ्या मनी ढग वांझोटे
पांढरे तेहि तिथे नव्हते ll २ ll
कुणा दिसे धवल ओंकार
कुणी ऐके नाद अनाहत
माझ्या पाठीस लागे रग
खाली खडे नि होते टोचत ll ३ ll
बसल्या बसल्या मग उगा
होतो दिवा स्वप्ने पाहत 
साक्षात्कार गुरुकृपा नि
मठ छानसा एक बांधत ll ४ ll
नव्हती श्रद्धा तरीही नम्र
आपले नशीब अजमावत
त्या तयांच्या कृपा प्रसादात
थर्माकोल तो उगाच वाहत ll ५ ll

विक्रांत प्रभाकर

केदार मेहेंदळे


vijaya kelkar


विक्रांत