अशीही एक आरती

Started by विक्रांत, June 17, 2013, 02:04:59 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


तिची तार तुटलेली
त्याचा स्वर फाटलेला
आरतीत होता त्यांच्या
रंग सारा विटलेला

होते माहित तरीही
तिने कानाडोळा केला
खोबऱ्यात मोदकांच्या
नारळ तो खवटला

काय दिले देवराया
पूजा अर्चा करुनिया
गळयामध्ये बांधियले
मज आग्या वेताळा या

तोही म्हणे का रे बाबा
हीच हडळ भेटली
ऐशीकैशी माझ्या गळा
दोर फासाची लावली

आधी कर रे सुटका
करू जय मग तुझा
कसे काय करायचे
प्रश्न सोडव तू तुझा

विक्रांत प्रभाकर             

santoshi.world


rudra


विक्रांत


मिलिंद कुंभारे



चंद्रकांत

आधी कर रे सुटका
करू जय मग तुझा
कसे काय करायचे
प्रश्न सोडव तू तुझा


----------------------------------

बरं, देवराया,
नाही घालवत वेळ तुझा वाया.
आणतो हुरुप मी जगत रहाया
विचारे अश्या की सर्व सृष्टी असे माया! 

sweetsunita66

छान कविता ,विनोद मस्त लिहिता तुम्ही ! :D :D

विक्रांत


PRASAD NADKARNI