चोरी झाली...

Started by Madhura Kulkarni, June 17, 2013, 08:31:26 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

. :D :D
.
.


आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध.

--------------------------------------

गद्यात जगणे मज, असे अता निषिद्ध.
करते मी गद्याचे प्रतिवर्षी प्रेमपूर्ण श्राद्ध.
अर्थात असे श्राद्धविधी कवितेत शब्दबद्ध
काव्यरचना म्हणजे जरी असे शब्दयुद्ध.
होती रणांगणी अगणित खचित शब्द विद्ध
चालतसे माझे तरीही शब्दयुद्ध अनिरुद्ध!

Madhura Kulkarni

शोभा जी , चारोळ्या करायला आवडतात वाटत तुम्हाला.....या लिंक वर क्लिक करा.....आणि चारोळ्या करायला खूप जण आहेत तिथे....
http://marathikavita.co.in/index.php/topic,10969.0.html

मिलिंद कुंभारे

चोर-बाजार शब्दांचा!

का मांडतोस तू;
चोर-बाजार शब्दांचा!
अन करतोस उपहास;
तिच्या माझ्या भावनांचा!

कधी कॉपी पेस्ट करून;
चोरोतोस तू;
त्याचं गुलाबी स्वप्नं!
तर कधी तिचं गोड हसणं!

तसंच कॉपी पेस्ट करून;
भरशील का तू;
तिच्या रिकाम्या घागरीत;
नभातल चांदणं!
होतील का
तिच्या डोळ्यांतील
अश्रूंची फुलं!
अन
उकलशील का?
जन्म अन मृत्यू मधलं;
अंतर एका श्वासाचं !

Madhura Kulkarni

मिलिंद दा, भारी हा.....

girish bhalerao

Ya chorya krun manse aata dnyanachya margas lagle aahe tr yat vavage kay zale.......

girish bhalerao

Jr konala yachi khant vatat asel tr tyache kavi manach nahi
Kavi ek  fulpakharu asto tyala  navashi kontahi hetu nsto