माझ्या नशिबात प्रेमच लिखित नाही ....

Started by प्रशांत दादाराव शिंदे, June 18, 2013, 11:14:39 AM

Previous topic - Next topic
ही  हार  माझी नाही 

मी तर  हरतच आलो आहे

फाटक्या   ह्या ओंजळीतून  सुख सांडलेले

मी  नेहमीच  पाहत आलो आहे

तू गेलीस  आज

हे  ही  एक  दिवस होणारच होते

कारण माझ्या नशिबात प्रेमच  लिखित नाही ....
-
© प्रशांत शिंदे
१८-०६-२०१३

वीणा

प्रेम कोणीही करेना, का अशी फिर्याद खोटी ?
प्रेम दे अन्यास आधी, ठेविशी का स्वार्थ पोटी ?

आपल्या या चारुतेशी विस्मरूनी जा सुकेशी
भाळता कोणास देशी का न भक्‍तीची सचोटी ?

प्रेम का संगीन गुच्छी, प्रेम का रंगीन ओठी
प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग त्याची ही कसोटी.

कवी -    माधव ज्यूलियन

sundar  vina ji