प्रवासी नट

Started by प्रशांत नागरगोजे, June 18, 2013, 01:18:50 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

मिटलेले शांत डोळे
आड तसेच शांत मन 
खांद्याला मागणारी आधार
कललेली वेडी  मान
खोडाला टेकलेली पाठ
जमिनीवर पसरलेले,
मातीत माखलेले पाय 
गुंतलेले एकमेकांत हात
वाऱ्यावर डोलणारा वृक्ष 
खाली दमून  निजलेला देह
मंद खेळणारा वारा 
हळुवार चालणारा श्वास
निळ्या आभाळाचा रंगमंच
अन तो प्रवासी  नट
                         -आशापुत्र

www.prashu-mypoems.blogspot.com

Madhura Kulkarni

नटाची व्यथा...


मिलिंद कुंभारे

छान आहे.... पण कवितेला प्रवासी  नट हे शीर्षक??? उमगत नाही!! :)

प्रशांत नागरगोजे

barobar mhanalat....pan mala shirshak suchat navhat mhanun.....deun takal :)

vijaya kelkar



rudra