भेट मला एकदाच.... अगदी अगदी अखेरचं....

Started by Madhura Kulkarni, June 19, 2013, 03:56:23 PM

Previous topic - Next topic

Madhura Kulkarni

फक्त एकदाच पाहायचं तुला,
असं दूर दूर जाण्याआधी....
जन्मानूजन्मीचं नात...
एका घावात तोडण्याआधी... 

फक्त एकदाचं घ्यायचाय
तुझा हात हातात....
साठवून ठेवायचीये तुझी
मोहक छबी डोळ्यांत....

नदीचा किनारा अन
गार गार वारं...
तुला आज सांगायचं
मनातलं सार..

निळ्या नदीतली नाव
सतत खुणावते...
'झाली निघण्याची वेळ'
सारख  सांगते....

नाव परतीची वेळ,
आता जायलाच हवे...
किनाऱ्यापल्याड
एकटेपणा सवे....

थांब ना ग थोडे,
तो येईल भेटाया ....
त्याच्या सोबत मलाही
घराकडे न्याया....

काटे घड्याळाचे,
किती वेगात धावती
चंद्राला आकाशी
चांदण्या सोबती

सारा दिवस सरला,
वाट पाहू तरी किती?
'भेट होईल कि नाही?'
मनी दाटते ग भीती....

तुलाच शोधते
अजुनी नजर...
येशील ना नक्की
मनात काहूर....

पाउल निघेना...
घुटमळते इथेच...
अधुरे मन माझे
आज राहिल रितेच??

भेटायचं होत एकदाच अगदी अगदी अखेरचं..!
तुझ्या सोबत पाहायचं होत एकदा जग बाहेरचं..!
पण तू आलाचं नाहीस....
पण तू आलाचं नाहीस....


Madhura Kulkarni





मिलिंद कुंभारे



rudra

madhura...tu kharach khup sundar kavita lihites....
pan ek chuki nehami kartes...
aga vede nav takat jaa...tuzhaval to ek purava hoto...
mag boltes mazhi kavita chori zhali......hahahahahahaahaahahaha.... 




Ankush S. Navghare, Palghar


sweetsunita66

भेटायचं होत एकदाच अगदी अगदी अखेरचं..!
तुझ्या सोबत पाहायचं होत एकदा जग बाहेरचं..!
पण तू आलाचं नाहीस....
पण तू आलाचं नाहीस....
:) very nice.

तुमसे आकर ना मिलने की कोई तो मजबुरी होगी ,
साथ चलके बीछड जानेकी कोई तो मजबुरी होगी ,
युही नही हमने तेरे  वादे पे भरोसा किया
हमारे बेवफा बनने की कोई तो मजबुरी होगी ............
                                                                         सुनिता नाड्गे [शेरकर ]

Madhura Kulkarni

मस्त ग....खूप छान केलीस चारोळी, सुनिता. आणि आवडल्या बद्दल धन्यवाद!