चारोळी

Started by sweetsunita66, June 19, 2013, 10:45:44 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66


साहोळी,,अष्टओळी अथवा दशोली
जरीही नसतील तुझ्या आजोळी
पण होता  प्रहरी चार सकाळी 
जरूर ऐकावी नित्य भूपाळी ......।
छान सवय आहे भूपाळी ऐकण्याची . .... तब्येत पाणी छान राहते म्हणे.........।  सुनिता :) ;) ;) ;) :D :D :D

सुषमा

"अप्रतिम ये शब्द भांडार तुम्हारा
       देगा क्या मेरी कविता को सहारा
अगर  तू मेरी द्रोणाचार्य  बनेगी
       तो मैं तेरी एकलव्य बनुंगी"

-----------------------------------------

अगे, लाडके, सुनीता नाड्‌गे,

वाचता भूपाळी होनाजी बाळाची
येते झणी लक्षात भाषाप्रवीणता त्याची
कुठे इंद्राचा ऐरावत,
कुठे शामभटाची तट्टाणी.
असो, आठव तू एकलव्याची कहाणी.

अगे, लाडके, सुनीता नाड्‌गे,

होती निपुणता एकलव्ये संपादिली
आपल्या आपणच, नेमबाजीतली
अतिपरिश्रमपूर्ण साधना ही होती त्याची गुरुकिल्ली!

vijaya kelkar

#12
 :) :) :)
गप्पांचा हा नवीन प्रकार फार छान आहे हं.
      '' चारोळी,चारोळी व चारोळी
        चारोळीची रांगोळी
         वाटीवर पहा  तरंगे
        बासुंदीत  केशरा संगे ''

सुनीता,,सुषमा थोडेसे धारिष्ट्य केले, बघा जमले आणि पटले कां?

vijaya kelkar

 :) :) :)
गप्पांचा हा नवीन प्रकार फार छान आहे हं.
      '' चारोळी,चारोळी व चारोळी
        चारोळीची रांगोळी
         वाटीवर पहा  तरंगे
        बासुंदीत  केशरा संगे ''

मधुरा,सुषमा थोडेसे धारिष्ट्य केले, बघा जमले आणि पटले कां?

sweetsunita66


वाचता भूपाळी होनाजी बाळाची,,,,,,,,,,,                                               
येते झणी लक्षात भाषाप्रवीणता त्याची,,,,,
कुठे इंद्राचा ऐरावत,
कुठे शामभटाची तट्टाणी.
असो, आठव तू एकलव्याची कहाणी.

अगे, लाडके, सुनीता नाड्‌गे,

होती निपुणता एकलव्ये संपादिली
आपल्या आपणच, नेमबाजीतली
अतिपरिश्रमपूर्ण साधना ही होती त्याची गुरुकिल्ली!
aso bhupali honaji balachi athawa aso ghanashyamachi     
ashi ahe wisheshta tyachi,gaatat udawinya zop ish-janachi,,
asel mi shabdbandhachya kewilwanya zope madhe.
tu utawales mala diwachuni subuddhe
aiyrawatachi barobari mi karu kashi,
mi ter shambhatachi tattani
tu matr kavirajachi patt rani..........sunita

sweetsunita66


sweetsunita66

 :D :DVIJAY CHAN PRAYATN AHE!!!!!!!! ;)

सुषमा

'' चारोळी,चारोळी व चारोळी
        चारोळीची रांगोळी
         वाटीवर पहा  तरंगे
        बासुंदीत केशरा संगे

सुनीता,सुषमा, थोडेसे धारिष्ट्य केले, बघा जमले आणि पटले कां?"


--------------------------------------


अगे, विजया, लाडके,

म्ह्टलेस तू "थोडे मी धारिष्ट्य केले."
बाळगुनि धारिष्ट्यची स्वशिक्षण आरंभिले
एकलव्ये, अन्‌ मग आपुले नैपुण्य संपादिले.

अतिपरिश्रमपूर्ण साधना होती गुरुकिल्ली त्याची
त्याच प्रकारे तूही होशील "शांता शेळके" उद्याची!

sweetsunita66



म्ह्टलेस तू "थोडे मी धारिष्ट्य केले."
बाळगुनि धारिष्ट्यची स्वशिक्षण आरंभिले
एकलव्ये, अन्‌ मग आपुले नैपुण्य संपादिले.

अतिपरिश्रमपूर्ण साधना होती गुरुकिल्ली त्याची
त्याच प्रकारे तूही होशील "शांता शेळके" उद्याची!

सुषमा ... सर्वच तुझे अति लाडके .
               देण्या आम्हा लेखनाचे धडे
               तूच शांता शेळके बन ना गडे
               मगच  शिकू आम्ही बापडे  :) :) :)

vijaya kelkar

        :)= :)
   'शांता शेळके 'एक काव्य विभूति
    'तव सदिच्छा'ही दिव्य विभूती
    साधेल हळू-हळू प्रगति
    वाढवेल सुषमा विजयेचे सुनीत