पाऊस म्हणजे

Started by Saee, June 21, 2013, 10:20:58 AM

Previous topic - Next topic

Saee

पाऊस म्हणजे सोहळा आठवणींचा
ज्याचा थेंब अन थेंब असे ओला
पाऊस म्हणजे तुझ्या माझ्यातील
अल्लड बालिश अबोला

पाऊस म्हणजे फक्त मी
तुझ्याच साठी घडलेली
पाऊस कळी चाफ्याची
तुझ्याच साठी उमललेली

पाऊस म्हणजे कधी तू भासतोस
रुबाबदार, हवाहवासा वाटणारा
का पाऊस म्हणजे तो ढग
तुला पाहण्यासाठी झटणारा

पाऊस आला कि होते तुझी आठवण
आयुष्यातलं सगळ्यात स्वप्नवत वळण
आणि पुन्हा सजतं तुझ्या प्रतीक्षेत
थेंबांच्या रांगोळीने माझं अंगण

भेटूयात पुन्हा पुढच्या पावसाळ्यात
घेऊन जातील सरी, मला तुझ्या विश्वात
भिजुयात दोघेही, पुन्हा कोसळणाऱ्या पावसात
पाहूयात जुळून येतो का आपल्यातला संवाद........


rudra

saee...sundar vakyarachna keli aahe...